लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम

(एल.टी.टी.ई. या पानावरून पुनर्निर्देशित)

एल.टी.टी.ई. तथा लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम (तमिळ: தமிழீழ விடுதலைப் புலிகள்; सिंहला: දෙමල ඊලාම් විමුක්ති කොටි සංවිධානය) ही श्रीलंकेत स्वतंत्र तमिळ भाषिक राष्ट्रासाठी लढणारी एक फुटीरवादी संघटना आहे. या संघटनेला भारतासह अनेक राष्ट्रांनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेले आहे.

तमिळ वाघ संघटनेचे चिन्ह

१९७६ साली वेलुपिल्लई प्रभाकरन ह्याने स्थापन केलेली ही संघटना अनेक वर्षे श्रीलंकेच्या उत्तर भागामध्ये कार्यरत होती. एल.टी.टी.ई.ने आपल्या अस्तित्वादरम्यान श्रीलंकेमध्ये अनेक दशशतवादी हल्ले घडवून आणले. १९९१ मध्ये माजी भारतीय पंतप्रधान राजीव गांधी व १९९३ साली श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रणसिंघे प्रेमदासा ह्यांची हत्त्या देखील तमिळ वाघांनीच केली. जून २००९ मध्ये झालेल्या अंतर्गत युद्धामध्ये श्रीलंकेच्या लष्कराने एल.टी.टी.ई.ला नेस्तनाबूत केले. एल.टी.टी.ई.चे जवळजवळ सर्व पुढारी मारले गेले किंवा अटक करण्यात आले.

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

तमिळ संकेतस्थळे

श्रीलंका सरकार संकेतस्थळ