एम.के. सरोजा
मद्रास कदिरावेलू सरोजा (७ एप्रिल, १९३१:चेन्नई, तमिळ नाडू, भारत - ) या भारतीय भरतनाट्यम आणि कथक नर्तिका आहेत.
सरोजा वयाच्या पाचव्या वर्षी भरतनाट्यम शिकायला लागल्या व त्यांनी नवव्या वर्षी आरंगेट्रम केले. १९४६मध्ये त्यांना जेमिनी स्टुडियोने चित्रपटांत काम करण्याचे कंत्राट देऊ केले परंतु सरोजा यांनी ते नाकारले. १९४९मध्ये त्यांचे लग्न कला इतिहासकार, नर्तक आणि नृत्यसमीक्षक मोहन खोकर यांच्याशी झाले. खोकर वडोदरा येथे महाराजा सयाजीराव विद्यापीठात नृत्यविभागाचे अधीक्षक असताना सरोजा या सुंदरलाल आणि कुंदनलाल गंगाणी या दोन गुरूंकडून कथक नृत्य शिकल्या. सुमारे ६५ वर्षाच्या नृत्यकारकिर्दीनंतर सरोजा २००० साली निवृत्त झाल्या.
त्यांना टागोर रत्न पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कारांसह अनेक सन्मान मिळालेले आहेत.