एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन

एम्प्रेस गार्डन ही पुण्यातील एक ऐतिहासिक बाग उद्यान एकूण एकर परिसरामध्ये विस्तारले आहे. वर्षभरातल्या बदलत्या ऋतूंतील निसर्ग सौंदर्याचे स्वरूप लोकांना पहावयास मिळावे अशी या उद्यानाची रचना करण्यात आली आहे या उद्यानात फिरताना हिरवळ, तळी, पाण्याया सर्वांचा अनुभव घेता येतो. विविध वैशिट्यपूर्ण वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.

तब्बल दोनशे वर्षांचा महाकाय वड, एखाद्या वृक्षाच्या खोडाएवढी जाडी असलेला दुर्मिळ कांचनवेल यांसह सुमारे अठराशे देशी-परदेशी वृक्षांची संपदा असलेल्या दीडशेहून अधिक वर्षे जुन्या एम्प्रेस गार्डन या पुण्याच्या मानबिंदू

वैशिष्ट्यपूर्ण वृक्षसंपदासंपादन करा

अर्ध्या एकरावर विस्तार असलेला कांचनवेल, किनई, धावडा, कळम, सीतेचा अशोक, कुसुंब, बेगर्स बाउल, चांदणंवावळ, मुचकुंद, टेमरू, ऑस्ट्रेलियन चेस्टनट, बेहडा, मास्ट ट्री, महोगनी, मोह, बांबूंचे जायंट-बुद्धास बेली-हिरवा-पिवळा असे प्रकार, मलेशियन ऍपल, बिबा, चक्राशिया, नांद्रुक, रुद्राक्ष, रक्तरोहिडा, समुद्रशोक, उर्वशी मेढशिंगी, गोरख चिंच, जांभूळ, आंबा, चेरी आदी अनेक जाती. या शिवाय अनेक औषधी वनस्पती येथे आहेत. गुलाब, तगरी पासून विविध शोभेची फुले या उद्यानाचे सौंदर्य खुलवतात. पाण्याचे झरे आणि विविध फुले यामुळे तऱ्हेतऱ्हेचे पक्षी येथे पाणी प्यायला आणि विसाव्याला येतात.

पुण्यातील आणि पुण्याबाहेरील अनेक छायाचित्रकारांचे एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन हे एक आवडते ठिकाण आहे.

या परिसरातील अनेक मंडळी रोज सकाळी व्यायाम करायला आणि सकाळची शुद्ध हवा घेण्यासाठी या उद्यानात येतात.

सध्या या उद्यानात अजून काही वैशिट्यपूर्ण गोष्टींची भर घालणे चालू आहे.

काळ[१]संपादन करा

ब्रिटिशकालीन एम्प्रेस गार्डनच्या मूळच्या 55 एकर जागेचे लचके तोडण्यात आल्याने आता ती सदतीस एकर उरली आहे. हे वैभवही टिकावे अशी

एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन तब्बल सव्वाशे वर्षांपासून "ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया' ही नामवंत संस्था पाहात आहे. या काळात संस्थेला उद्यान सांभाळताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. मूळ बागेतील काही जागा रस्ते-कालवे यासाठी द्यावी लागली. त्यानंतर टर्फ क्‍लबला चार एकर जागा घोड्यांचे तबेले बांधण्यासाठी देण्यात आली. एवढे झाल्यानंतर वन खात्याने संशोधन करण्यासाठी काही जागा मागितली. "वन खात्याच्या ताब्यातील या जागेवर संशोधन केंद्राचा फलक आहे, मात्र तिथे कोणतेच संशोधन होताना दिसत नाही,'' असे निरीक्षण संस्थेचे मानद सचिव सुरेश पिंगळे नोंदवतात. याखेरीज मागे कॅंटोन्मेंट न्यायालयासाठीही उद्यानाची जागा मागण्याचा प्रयत्न झाला होता, अशी आठवणही ते सांगतात.

त्याचे रूपांतर जागतिक वनस्पती उद्यानात (बोटॅनिकल गार्डन) करण्याची आमची योजना आहे, त्यासाठी या उद्यानात दरवर्षी सुमारे शंभर नवे आणि दुर्मिळ जातींचे वृक्ष लावण्यात येतात.

एम्प्रेस गार्डनच्या दीडशे वर्षांतील टप्पे -संपादन करा

- सुमारे 1818 नंतरच्या काही वर्षांनी - ब्रिटिश सैनिकांच्या विश्रांतीसाठी उभारलेल्या बागेला "सोल्जर्स गार्डन' असे नाव

- 1887 - व्हिक्‍टोरिया राणीच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने बागेचे "एम्प्रेस गार्डन' असे नामकरण

- 1892 - मुंबईत 1830 मध्ये स्थापन झालेल्या आणि तेथे राणीचा बाग-वस्तुसंग्रहालय उभारलेल्या आणि पुण्यातील खडकीत वनस्पती उद्यान उभारलेल्या "ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया' या संस्थेकडे एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन सुपूर्त

- 1947 म्हणजे स्वातंत्र्यानंतर सी. डी. देशमुख संस्थेच्या अध्यक्षपदी, त्यांच्यानंतर सांगलीचे महाराज, मोहन धारिया, शंतनूराव किर्लोस्कर आणि राहुलकुमार बजाज (विद्यमान) आदींनी भूषविले अध्यक्षपद

- 1970 च्या आसपास "टर्फ क्‍लब'ला घोड्यांच्या तबेल्यांसाठी चार एकर जागा

- 1972 - आर्थिक अडचणींतून मार्ग काढण्याचा संस्थेच्या बैठकीत निर्धार आणि मानद सचिवपदी सुरेश पिंगळे यांची नियुक्ती, त्यानंतर प्रदर्शने-वृक्षसंवर्धन आदी विविध उपक्रमांनी उद्यान बनले पर्यटकांचे आकर्षण

भा.वि. भागवतसंपादन करा

https://mr.wikipedia.org/s/2mq5 Jump to navigationJump to search प्रा. भालचंद्र व्ही. भागवत, एफ.सी.आय; ए.सी.आर.ए., हे एक मराठी लॅंडस्केप आर्किटेक्ट असून पुण्यातील नामवंत उद्यानतज्ज्ञ होते.

पुण्याची एम्प्रेस गार्डन त्यांनी बनवली.

माहिती व पर्यटनसंपादन करा

  • ^ "पुण्याचा मानबिंदू एम्प्रेस गार्डनचा लचका तोडण्याचा सरकारी डाव | eSakal". www.esakal.com. 2019-12-16 रोजी पाहिले.