एडवर्ड आल्बी
एडवर्ड आल्बी (१२ मार्च, इ.स. १९२८ - १६ सप्टेंबर, इ.स. २०१६) हे एक अमेरिकन नाटककार होते. त्यांनी उत्तरायुष्यात प्रेक्षकांना बौद्धिक आवाहन करणारी नाटके लिहिली. तरुणपणी त्यांना चार शिक्षणसंस्थांमधून काढून टाकण्यात आले होते.
निवडक नाटके
संपादनआल्बी यांनी एकूण ३० नाटके लिहिली.
- अ डेलिकेट बॅलन्स’ (१९६७) - पुलित्झर पारितोषिक
- थ्री टॉल विमेन (१९९४) - - पुलित्झर पारितोषिक
- मी, मायसेल्फ अँड आय (२००७) : अॅब्सर्ड पद्धतीचे नाटक. २००८ मध्ये रंगमंचावर आले.
- सीस्केप (१९७५) - पुलित्झर पारितोषिक
- हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ : एका बुद्धिजीवी दाम्पत्यातील अंतर्विरोध, त्यातून दोघांचीही होणारी फरपट हा आल्बीने १९६०-६१ साली लिहिलेल्या एका नाटकाचा विषय होता. या नाटकावर पुढे चित्रपट निघाला.