एन्डेव्हर एर
(एंडेव्हर एर या पानावरून पुनर्निर्देशित)
एन्डेव्हर एर अमेरिकेतील प्रादेशिक विमानकंपनी आहे. ही कंपनी डेल्टा एर लाइन्सची उपकंपनी असून ती डेल्टा कनेक्शन या नावाने सेवा देते. १९८५मध्ये एक्सप्रेस एरलाइन्स वन या नावाने सुरू झालेल्या या कंपनीने २००२मध्ये पिनॅकल एरलाइन्स असे नाव घेतले. २०१२मध्ये हिच्या मुख्य कंपनीने दिवाळे काढल्यावर डेल्टा एर लाइन्सने त्याची मालमत्ता ताब्यात घेउन हीच कंपनी एन्डेव्हर एर नावाने २०१३मध्ये सुरू केली.
या कंपनीचे मुख्यालय मिनियापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळावर असून मुख्य ठाणी मिनियापोलिस, डीट्रॉइट, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया आणि न्यू यॉर्क-जेएफके विमानतळांवर आहेत.