एंजल्स अँड डेमन्स

(एंजेल्स अँड डीमन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
एंजल्स अँड डेमन्स
लेखक डॅन ब्राऊन
अनुवादक बाळ भागवत
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार कादंबरी
प्रकाशन संस्था मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रथमावृत्ती ऑगस्ट, २००९
मुखपृष्ठकार फाल्गुन ग्राफिक्स
पृष्ठसंख्या ४३६
आय.एस.बी.एन. ९७८-८१-८४९८-०४५-५

कथानक

संपादन

प्राचीन गुप्त आणि रहस्यमय संघटना -
कधी ऐकले नाही असे अस्त्र, कल्पनाच करता येणार नाही असे लक्ष्य.

एका मृत फिजिसिस्टच्या छातीवर उमटल्या गेलेल्या
प्रतीकाचा अर्थ कळून घेण्यासाठी, रॉबर्ट लॅंग्डन या
हार्वर्ड विद्यापीठातील नामवंत चिन्हशास्त्र तज्ज्ञाला स्वित्झर्लंडमधल्या
सुप्रसिद्ध 'सर्न' या संशोधन संस्थेकडून बोलावले गेले.

व्हिट्टोरिया या शास्त्रज्ञाबरोबर रॉबर्ट लॅंग्डन, व्हॅटिकनला
उद्ध्वस्त करू शकणाऱ्या या अस्त्राचा शोध घेऊ लागला.
कॅथलिक चर्चचा भीषण सूड उगवण्यासाठी शेकडो वर्षे टपलेल्या,
'इल्यूमिनाटी' या पंथाचे गुप्त ठिकाण शोधण्यासाठी
धोकादायक भुयारे, दफनभूमी, एकाकी कथीड्रल्स,
यांच्यामधून शोध घेत ते धावू लागले.
अपहृत कार्डिनल्सच्या भीषण आणि क्रूर हत्यांचे साक्षीदारही बनले.

भयानक कटकारस्थानाच्या मुळाशी पोहोचताना व्हॅटिकनचा बचाव
करण्यासाठी जिवावर उदार होऊन केलेल्या अतुलनीय साहसाचा
खरा अर्थसुद्धा किती विलक्षण धक्कादायक ठरावा?