ॲथलेटिक्स संक्षिप्तरुपे

(ऍथलेटिक्स संक्षिप्तरुपे या पानावरून पुनर्निर्देशित)

विक्रम

संपादन
  • WR = विश्वविक्रम
  • OR = ऑलिंपिक विक्रम
  • CR = चॅंपियनशिप विक्रम
  • GR = खेळातील विक्रम
  • AR = क्षेत्र (किंवा कॉंटिनेन्टल) विक्रम
  • NR = राष्ट्रीय विक्रम (एखाद्या देशासाठी)
  • MR = विक्रमाशी बरोबरी
  • DLR = डायमंड लीग विक्रम

J अक्षर लावल्यास तो विक्रम ज्युनियर विक्रम दर्शवतो

  • WJR = जागतिक ज्युनियर विक्रम
  • AJR = क्षेत्र (किंवा कॉंटिनेन्टल) ज्युनियर विक्रम
  • NJR = राष्ट्रीय ज्युनियर विक्रम (एखाद्या देशासाठी)
  • # = विक्रम स्विकारला गेला नाही हे दर्शवतो. हेच चिन्ह निकालामधील अनियमितता सुद्धा दर्शविते
  • X = ॲथलीट कामगिरी केल्यानंतर अपात्र ठरवला गेला हे दर्शविते (बहुतेक वेळी उत्तजेक द्रव्य सेवनासंदर्भात दोषी ठरल्यानंतर)

सर्वोत्तम

संपादन
  • WYB = विश्व युवा सर्वोत्तम
  • WB = विश्वात सर्वोत्तम (आयएएएफ विश्व स्पर्धांशिवाय इतर स्पर्धांमध्ये)
  • PB = वैयक्तिक सर्वोत्तम
  • SB = मोसमात सर्वोत्तम
  • WL = विश्व अग्र मानांकन (एखाद्या मोसमात जगातील सर्वोत्तम कामगिरी)

परिस्थिती व अटी

संपादन
  • A = समुद्रसपाटीपासून उच्च पातळीवर कामगिरीचा उच्चांक
  • w = वाऱ्याच्या मदतीने उच्चांक
  • NWI = वाऱ्याची माहिती नाही

ज्या प्रकारांमध्ये वाऱ्याची मदत हा एक महत्त्वाचा घटक असतो (२२० यार्ड किंवा कमी अंतराच्या मैदानी शर्यती, लांब उडीतिहेरी उडी), तेथे वाऱ्याचा वेग मीटर प्रति सेकंद किंवा मी/से असा नोंदविला जातो.

  • a = रस्त्यावरील शर्यतीमध्ये, ॲथलीट्सला मदत करणारी परिस्थिती दर्शवते (डोंगरउतार, मदत करणारा वारा, पॉंईंट टू पॉंईंट)
  • + = दीर्घ शर्यतींमध्ये दरम्यानच्या अंतरासाठी घेण्यात आलेली वेळ दर्शवते
  • c = converted mark दर्शवते
  • DNF = स्पर्धक शर्यत पूर्ण करु शकला नाही
  • DNS = स्पर्धक शर्यत सुरू करु शकला नाही
  • DQ = अपात्र
  • i = इनडोअर
  • n = विजय न मिळवता आलेला वेळ
  • NH = उंची नाही
  • NM = मार्क नाही
  • Q = मोठ्या शर्यतींमध्ये आपोआप पात्र
  • q = दुय्यम पात्रता, क्रमवारीत विशिष्ट स्थान किंवा अंतराचे लक्ष्य पार न करता, विहित क्षेत्रात सर्वोत्तम वेळ किंवा अंतर पार करून
  • y = शर्यतीच्या अंतराचे एकक यार्ड होते