(ऱ्हस्व) ऌ साचा:ध्वनित्र हवे आणि (दीर्घ) ॡ साचा:ध्वनिचित्र हवे हे मराठी भाषेच्या वर्णमालेतील अनुक्रमे ११वे आणि १२वे स्वरोच्चार वर्ण चिन्ह आहे.

उच्चारण

संपादन

ऌ असलेले मराठी शब्द

संपादन
  • ऌकार= ऌ हे अक्षर किंवा त्याचा उच्चार. हा उच्चार 'लि' आणि ’लु’ यांच्या मधला असतो.
  • क्लृप्ती = युक्ती

वरील शब्दांशिवाय संस्कृतमध्ये असलेले ऌचे अन्य शब्द

संपादन
  • माहेश्वरी सूत्रांतले दुसरे सूत्र 'ऋ ऌ क्' असे आहे.
  • ऌ हे संस्कृतमधील प्रत्यय लागणारे (aptote) एकाक्षरी नाम आहे. त्याचे अर्थ : दैवी स्वरूप, पृथ्वी, पर्वत, देवमाता, तंत्रविद्येतील अक्षर.
  • ऌट्‌ = द्वितीय भविष्यकाळ
  • ऌङ्‌ = संकेतार्थ
  • शकॢ = शक्‌ या ४थ्या गणातील धातूला पाणिनीने दिलेले नाव. व्यंजनान्त एकावयवी धातूंपैकी जे १०२ धातू ’अनिट’ आहेत त्यांतला हा पहिला धातू. पहा : कारिकेतील पहिली ओळ-
शकॢ पच्‌ मुचि रिच्‌ वच्‌ विच्‌ सिच्‌ प्रच्छि त्यज्‌ निजिर्भज
  • शाऌ = पहिल्या गणाच्या शाल्‌ (अर्थ खुशामत करणें) या धातूला पाणिनीने दिलेले नाव.
  • कॢप्‌ = एक संस्कृत धातू. अर्थ कल्पणें. त्यावरून सङ्कॢिप्त, वगैरे.
  • शक्‍ऌ-गम्‍ऌ (शक्‌-गम्‌ या धातूंच्या अद्यतन भूतकाळाची रूपांच्या, अशकत्‌‌-अगमत्‌ आधी अ लागतो, हे सांगण्यासाठीचा पाणिनी ऌ हा प्रत्यय वापरतो. याहून कमी शब्दांत हा नियम सांगता येणार नाही! थोडक्यात ज्या धातूच्या मूळ रूपाला पाणिनी ऌ जोडतो त्या धातूच्या अनद्यतन भूतकाळाच्या (पहिल्या भूतकाळाच्या) रूपातले पहिले अक्षर अ असते.
  • लुङ्सनोर्घसॢ - पाणिनीची अष्टाध्यायी ...२/४/३७.
  • विभाषा लुङ्लृङोः । पाणिनीची अष्टाध्यायी ,,, २/४/५०
  • लृट् शेषेच । पाणिनीची अष्टाध्यायी ,,,३/३/१३
  • लृटः सद् वा । पाणिनीची अष्टाध्यायी ,,, ३/३/१४
  • अनद्यतने लुट् । पाणिनीची अष्टाध्यायी ,,, ३/३/१५
  • पुषादिद्युताद्यॢदितः परस्मैपदेषु । ...पाणिनीची अष्टाध्यायी ,,, ३/१/५५

दीर्घ ॡ

संपादन

पाणिनीकालीन संस्कृतमध्ये दीर्घ ॡ नाही (मराठीत आहे!). तत्त्वत: ज्याअर्थी लिपीत ऱ्हस्व ऌ आहे, त्याअर्थी दीर्घ ॡ असलाच पाहिजे, भले ते अक्षर असलेला रूढ शब्द हल्लीच्या मराठीत नसेना का!.

पाणिनीनंतरच्या काळात मात्र तंत्रविद्येच्या संदर्भात ॡ (दीर्घ ऌ) हे अक्षर येते. उदा०

ॡर्महात्मा सुरो बालो भूपः स्तोमः कथानकः।
मूर्खः शिश्नो गुदः कक्षा केशः पापरतो नरः॥

हा श्लोक 'मंत्र महाबोधि'त आला आहे.

दीर्घ ॠ

संपादन

संस्कृतमध्ये दीर्घ ॠ असलेले अनेक शब्द आहेत. भ्रातॄण (भावाचे कर्ज), पितॄण (पित्याचे कर्ज). शिवाय,

  • धातू : ॠ =जाणें; कॄ = इतस्ततः फेकणें; स्‍तॄ = आच्छादणें
  • मराठी काव्यात कधीकधी मात्रा किंवा वृत्त जुळवण्यासाठी ॠ (दीर्घ ऋ) येतो. उदा० बहू शापिता कष्टला अंबषी। तयाचे स्वयें श्रीहरी जन्म सोशी ॥ ....... मनाचे श्लोक.. ११६.

आणि, षी वचने ऐकोनी संतोषला सूतमूनी । बरवा प्रश्न केला म्हणोनी ॥ हर्षे उल्हासे ॥ - (श्री मुक्तेश्वर आख्यान अध्याय १, श्लोक १५वा)