ऋषिका जुहु ही एक सूक्त द्रष्टी व ब्रह्मवादिनी . हिच्या नावावर ऋग्वेदातील १०.१०९ हे सूक्त आहे.या सूक्तात तिने सृष्टी व तिच्यासाठी आवश्यक असलेले तप यांची उत्पत्ती सत्यापासून झाली असल्याचे सांगितले आहे. ती म्हणते, अमर्याद समुद्र, अंतरिक्ष तील वायू , अंधार नष्ट करणारे प्रभावी तेज उग्र परंतु हितप्रद असे तप आणि दिव्य उदक हे सर्व सनातन सत्यापासून प्रथम उत्पन्न झाले.जो प्रार्थना व तप यात निमग्न असतो, तो देवांपैकीच एक होतो. तिच्या काही अन्य ऋचांतून सामाजिक प्रतिष्ठा यामागील गुणकर्माचे स्थान स्पष्ट होते.. या सूक्तात एक छोटेशे कथाबीज आढळते , ते असे , ज्याप्रमाणे सोमाने नेलेली बृहस्पतीची पत्नी त्याला परत मिळाली, त्याप्रमाणे एका ब्राह्मणाला देवांचे मध्यस्थीने मिळाली .या घटनेवर जुहू ने असे भाष्य केले आहे कि धर्माने विवाहबद्ध झालेल्या स्त्रीला पतीकडे परत पोचवून देवांनी एका पातकाचे निरसन केले.त्यामुळे पृथ्वीतील उर्जस्वितेचा उपभोग घेऊन (जनता) नेहमी सर्वव्यापी ईश्वराची उपासना करू शकते.[]

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड ३