उरण इस्लामपूर हे एक सांगली जिल्ह्यातील एक प्रमुख शहर असून, उरण इस्लामपूर नगरपरिषदेची स्थापना दि. १६-११-१८५३ रोजी झालेली आहे. सन २००१ चे जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ५८३३० इतकी आहे. उरण-इस्लामपूर नगरपालिका ही "ब" वर्ग नगरपालिका आहे. उरण-इस्लामपूर शहराचे क्षेत्र ४०४२ हेक्टर इतके आहे.[ संदर्भ हवा ]

नरपालिका हद्दीत एकूण २६ वार्ड असून त्यामधून २६ नगरसेवक निवडून आलेले आहेत. तसेच नगरपालिकेत ३ नामनिर्देशित सदस्य आहेत. शहराचे पश्चिम हद्दीपासून पुणे बेंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ हा सर्वसाधारणपणे २.५ किलोमीटर असून, पेठ-सांगली राज्य मार्ग क्र. १३८ हा शहरातून जातो.[ संदर्भ हवा ]

शहरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणेसाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. शहरात पाण्याच्या अनुक्रमे १) ७ लाख २) ७.५ लाख ३) ७.५ लाख लिटर्स क्षमता असलेल्या पाण्याच्या टाक्या असून सदर टाक्यांना ११ किलोमीतर अंतरावरून कृष्णा नदीतून दोन टप्प्यातून पाणी पुरविले जाते. उरण-इस्लामपूर नगरपरिषद ही वाटर मीटरद्वारे पाणीपट्टी आकारणी करणारी राज्यातील कदाचित एकमेव नगरपरिषद आहे.या गावापासून १० कि.मी अंतरावर नरसिंगपूर आहे.इस्लामपूर शहरामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयासारखी काही नामांकित महाविद्यालये आहेत त्यामध्ये के.आर.पी.कन्या,मालती कन्या तसेच आर.आय.टी.महाविद्यालयासारख्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचा ही समावेश होतो. इस्लामपूर हे निमग्रामीन असे शहर आहे.या शहराचा मुख्य भाग उरण आहे तेथूनच खऱ्याअर्थाने शहराचा विस्तार झाल्याचा पहावयास मिळतो.म्हणूनच या शहराच्या आदि उरण हे नाव लावले जाते उरण-इस्लामपूर असे म्हंटले जाते.या उरण भागामध्ये शंकराचे मोठे मंदिर आहे.तेथे दरवर्षी शंभूआप्पाच्या नावाने आठ दिवस मोठया प्रमाणात उरूस भरतो.इस्लामपूर शहराच्या बाजूला राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना व त्या लगत मोठे राम मंदिर आहे.मंदिराच्या लगत राजारामबापू पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.[ संदर्भ हवा ]

राजकारण:

इस्लामपूर हे शहर वाळवा तालुक्यातील मुख्य ठिकाण आहे जरी तालुक्याचे नाव वाळवा असले तरी सर्व शासकीय कार्यालये ही इस्लामपूर मध्येच पाहायला मिळतात.वाळवा हा विधानसभेचा मतदारसंघ आहे कि ज्या ठिकाणाहून राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रतिनिधित्व करतात.इस्लामपूर ही नव्याने तयार झालेली नगरपरिषद असून त्यामध्ये एकूण २६ प्रभाग आहेत.या २६ प्रभाघातून २६ नगरसेवक प्रतिनिधित्व करत आहेत.सुरुवातीपासूनच ही नगरपरिषद राष्ट्रावादी काँग्रेसच्या ताब्यात होती पण अलिकडे नव्याने झालेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या मदतीने निशिकांत पाटील हे थेट जनतेतून नगराध्यक्ष झाले व ही नगरपरिषद भाजपच्या ताब्यात गेली.तसे इस्लामपूर हे राजकीयदृष्ट्या फार संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. पूर्वी या शहराचे सलग सुमारे २५ वर्षे नगराध्यक्ष कै. एम. डी. पवार हे होते.[ संदर्भ हवा ]

शासकीय कार्यालये

इस्लामपूर हे शहर वाळवा तालुक्यात येत असले तरी तालुक्यासाठी असणारी सर्व शासकीय कार्यालये इस्लामपूर मधेच आहेत. यामध्ये तहसीलदार, प्रांत कार्यालय, पोलीस ठाणे,उपविभागीय पोलीस कार्यालय , फौजदारी व दिवाणी न्यायालय, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय , भूमिअभिलेख कार्यालय, सिटी सर्वे कार्यालय , मुद्रांक व दस्त नोदनी कार्यालय इ. प्रमुख कार्यालयांचा समावेश होतो.

शिक्षण

शहरामध्ये विविध प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आहेत.मराठी माधामिक शाळांमध्ये प्रामुख्याने आदर्श बालक मंदिर, इस्लामपूर हायस्कुल , विद्यामंदिर , सद्गुरू विद्यालय , यशवंत हायस्कुल इ. प्रमुख आहेत. इंग्रजी माध्यम शाळांमध्ये प्रकाश पब्लिक स्कूल, विद्यानिकेतन इ.चा समावेश होतो.

महाविद्यालयामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील हे महाविद्द्यालय सर्वात जुने असून त्याची स्थापना १९६१ साली झाली. ग्रामीण भागातील एक अग्रगण्य महाविद्यालय म्हणून ते ओळखले जाते. पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हेविशेष नावारूपाला आले आहे. त्यामधून अनेक अधिकारी शासकीय पदावर कार्यरत आहेत. [ संदर्भ हवा ]