उमदी हे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जिल्ह्याच्या पूर्व टोकास वसलेले शहर आहे. सांगली पासून १३९.४ कि.मी. अंतरावर आहे.गावाची लोकसंख्या २५,००० पेक्षा जास्त आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून दुध उत्पादन हा जोडधंदा आहे. गावात सर्व शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे गावात नेहमीच लोकांची वर्दळ असते. उमदी येथे 500 हेक्टर वर एमआयडीसी मंजूर झाली आहे व लवकरच सुरू होत आहे.मल्लिकार्जुन देवस्थान हे गावातील लोकांचे मुख्य श्रद्धास्थान आहे.