उदंचन जलविद्युत प्रकल्प
उदंचन जलविद्युत प्रकल्प हा जलविद्युत प्रकल्पातील एक प्रकार आहे. या प्रकारच्या प्रकल्पांमध्ये एखाद्या उंचीचा उपयोग करून पाण्याचा पुनर्वापर करून वीजनिर्मिती केली जाते. यामध्ये दोन जलाशयांचा वापर केला जातो.
ऊर्ध्व जलाशयातील पाण्याचा वापर विजेच्या जास्त मागणीच्या काळात केला जातो व वीजनिर्मिती केली जाते. विजेच्या कमी मागणीच्या काळात हे निम्न जलाशयात साठवलेले पाणी स्वस्त वीज वापरून पुन्हा ऊर्ध्व जलाशयात टाकले जाते.