उत्तरमीमांसादर्शन
उत्तरमीमांसा यालाच ब्रह्ममीमांसा असेही म्हणतात. मीमांसा याचा अर्थ जिज्ञासा असा होतो.
उत्तरमीमांसेचा कर्ता महर्षी व्यास हा आहे.
व्यासकृत ब्रह्ममीमांसा चार अध्याय असून प्रत्येक अध्यायाचे चार पाद आहेत. प्रथमाध्यायांत सर्व उपनिषद्वाक्यें ब्रह्माचें प्रतिपादन करतात, अन्याचें नाहीं, असा अर्थ आहे. दुस-या अध्यायांत प्रथम श्रुतिवाक्याशीं स्मृतिवाक्यांचा विरोधपरिहार करून नंतर उपनिषद्वाक्यांचाहि परस्पर विरोधपरिहार केला आहे. तृतीयाध्यायांत ज्ञान व उपासना यांच्या साधनांचा विचार केला आहे, आणि चौथ्या अध्यायांत ज्ञान व उपासना यांच्या फलाचा विचार केला आहे. हें ब्रह्ममीमांसा-शारीरकशास्त्रच प्रधान असून मुमुक्षूला हेंच चिंतनीय आहे.