ईस्ट सेंट लुइस हे अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शहर आहे. सेंट लुइस शहरापासून जवळ मिसिसिपी नदीवर असलेले हे शहर सेंट लुइस महानगराचा भाग समजले जाते. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २७,००६ होती. १९५०च्या तुलनेत ही संख्या १/३ होती. गेल्या ५०-६० वर्षांत ईस्ट सेंट लुइस व आसपासच्या भागातील कारखाने बंद पडून येथील रोजगारी कमी झाल्याने ही वस्तीघट झाली आहे.

इंटरस्टेट ७०, इंटरस्टेट ५५ आणि इंटरस्टेट ६४ हे महामार्ग ईस्ट सेंट लुइसच्या हद्दीत एकमेकांस मिळतात.