ईश उपनिषद (पुस्तक)
ईश उपनिषद हे पुस्तक म्हणजे म्हणजे श्रीअरविंद लिखित उपनिषद्स [१] या इंग्रजी पुस्तकातील ईश उपनिषदाचे भाषांतर आहे. सेनापती पां.म.बापट यांनी हे भाषांतर केले आहे. मूळ इंग्रजी पुस्तकात ईश उपनिषदाखेरीज इतर उपनिषदांचाही समावेश आहे.
ईश उपनिषद | |
लेखक | श्रीअरविंद |
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) | Isha Upanishad |
अनुवादक | सेनापती पां.म.बापट |
भाषा | इंग्रजी - मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | भाष्यग्रंथ |
प्रकाशन संस्था | श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट |
प्रथमावृत्ती | १९६९ |
चालू आवृत्ती | २०२० |
विषय | ईश उपनिषदाचे भाषांतर व त्यावरील भाष्य |
पृष्ठसंख्या | १४६ |
आय.एस.बी.एन. | 978-81-7058-790-3 |
पुस्तकाची मांडणी
संपादनया पुस्तकाचे प्रमुख दोन विभाग आहेत.
पहिल्या भागात ईश उपनिषदाची मूळ संहिता आणि त्याचे भाषांतर आले आहे.
दुसऱ्या भागाचे शीर्षक पृथक्करण असे आहे. याची मांडणी पुढीलप्रमाणे आहे.
क्र. | विभागाचे नाव | प्रकरणे |
---|---|---|
०१ | प्रास्ताविक | उपनिषदाची वैचारिक योजना |
०२ | पहिली विचारधारा | |
निवास करणारा ईश्वर | ||
०३ | दुसरी विचारधारा | |
ब्रह्मन् | ||
आत्मसाक्षात्कार | ||
०४ | तिसरी विचारधारा | |
ईश्वर | ||
विद्या आणि अविद्या | ||
संभूती आणि असंभूती | ||
०५ | चौथी विचारधारा | |
लोक-सूर्य | ||
कृती आणि ईश्वरी इच्छा | ||
०६ | समाप्ती आणि सारांश |
पुस्तकाचे वैशिष्ट्य
संपादनपुस्तकामध्ये तळटिपा देण्यात आल्या आहेत, त्यामुळे पुस्तकाचे संदर्भ-मूल्य वाढले आहे.[२]