इलेक्ट्रॉनिक वाणिज्य

फायदे
(इलेक्ट्रॉनिक कॉमर्स या पानावरून पुनर्निर्देशित)

इलेक्ट्रॉनिक वाणिज्य, अर्थात इलेक्ट्रॉनिक कॉमर्स किंवा इ-कॉमर्स, ([[इंग्लिश मराठी |इंग्लिश]]: Electronic commerce, e-commerce ;) म्हणजे इंटरनेटाद्वारे उत्पादन आणि सेवांची करता येणारी खरेदी आणि विक्री होय. इंटरनेटाच्या वाढत्या व्यापामुले आणि त्याचा लोकप्रियतेमुळे इंटरनेटावरील व्यापाराला कमालीची चालना मिळालेली आहे. इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतर, पुरवठा व्यवस्थापन करणे, इंटरनेट-आधारित विपणन, ऑनलाइन ट्रान्झॅक्शन प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक डेटा आंतरबदल, वस्तुसूची व्यवस्थापन प्रणाली आणि स्वयंचलित डेटा संग्रहण या नव्या इंटरनेट-आधारित सुविधांचा इलेक्ट्रॉनिक वाणिज्याच्या प्रसारात महत्त्वाचा वाटा आहे.

इलेक्ट्रॉनिक वाणिज्याच्या वापराचा मोठा हिस्सा फक्त आभासी किंवा संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या अशा गोष्टींसाठी वापरला जातो. उदाहरणार्थ एखादा लेख किंवा एखादी महत्त्वाची माहिती जी फक्त इ-पेमेंट केल्यावरच पाहता येते. बऱ्याच वेळेला इलेक्ट्रॉनिक वाणिज्याबरोबर वस्तू किंवा माल ह्यांची वाहतुकीद्वारे पोचही जोडली गेलेली असते. ऑनलाईन किरकोळ विक्रेत्यांना इ-टेलर म्हणतात आणि किरकोल विक्रीला इ-टेल म्हणतात. जवळपास सगळेच मोठे किरकोळ व्यापारी आज इलेक्ट्रॉनिक वाणिज्याद्वारे आंतरजालाशी जोडले गेले आहेत.

एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याबरोबर केलेल्या इलेक्ट्रॉनिक वाणिज्याला बिझनेस-टू-बिसनेस इलेक्ट्रॉनिक वाणिज्य (बी-टू-बी इलेक्ट्रॉनिक वाणिज्य) म्हणतात. बी-टू-बी इलेक्ट्रॉनिक वाणिज्य कधी कधी सर्वांसाठी खुले असते, तर कधी विशिष्ट व्यापाऱ्यापर्यंत सीमित असते. एका व्यापाऱ्याने आपल्या ग्राहकाबरोबर केलेल्या बी-टू-बी इलेक्ट्रॉनिक वाणिज्याला बिझनेस-टू-कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक वाणिज्य (बी-टू-सी इलेक्ट्रॉनिक वाणिज्य) म्हणतात. अ‍ॅमेझॉन.कॉम सारख्या कंपन्या अशा प्रकारचे बी-टू-सी इलेक्ट्रॉनिक वाणिज्य करतात. ऑनलाईन खरेदीच्या वेळेस ग्राहक विक्रेत्याच्या संगणकाशी इंटरनेटाद्वारे थेट संपर्कात असतो. त्यात अन्य घटकांची मध्यस्थी नसते. खरेदी आणि विक्री या प्रक्रिया पूर्णपणे इंटरनेटावरच पार पडतात.

इलेक्ट्रॉनिक वाणिज्य केवळ खरेदी आणि विक्रीशी संबंधित नसून त्याचा वापर माहितीची देवाणघेवाण करण्यातही होतो. बऱ्याचदा आर्थिक माहितीची देवाणघेवाण इलेक्ट्रॉनिक वाणिज्याद्वारे होत असते.