मुख्य मेनू उघडा

इराण एअर - इराणच्या इस्लामिक प्रजासत्ताकाची विमान कंपनी (फारसी: هواپیمايی جمهوری اسلامی ایران‎) ही इराण देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९४४ साली स्थापन झालेल्या इराण एअरचे मुख्यालय तेहरानच्या मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर असून तिच्या ताफ्यामध्ये ५१ विमाने आहेत. सध्या इराण एअरमार्फत जगातील २३ देशांतील ४२ शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते.

इराण एअर
आय.ए.टी.ए.
IR
आय.सी.ए.ओ.
IRA
कॉलसाईन
IRAN AIR
स्थापना १९४४ (इराण एअरवेज कंपनी)
उड्डाणांची सुरूवात १९६१
हब तेहरान इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळ
मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरे मशहद
शिराझ
इस्फहान
ताब्रिझ
फ्रिक्वेंट फ्लायर फाल्कन फ्लायर
विमान संख्या ५१
गंतव्यस्थाने ६०
ब्रीदवाक्य Our Mission Is Your Safety
मुख्यालय तेहरान, इराण

१९७०च्या दशकात इराण एअर झपट्याने प्रगती करणारी कंपनी होती. सुरक्षिततेच्या बाबतीत क्वांटास खालोखाल जगात तिचा दुसरा क्रमांक मानला जात असे. १९७९ सालच्या इराणी क्रांतीनंतर इराण एअरमध्ये बरेच बदल घडून आले. २०१० सालापासून युरोपियन संघाने इराण एअरच्या विमानांना आपल्या सदस्य देशांतील विमानतळांवर इंधन भरण्यावर बंदी घातली. अमेरिकेने इराणवर घातलेले आर्थिक निर्बंध हे ह्याचे प्रमुख कारण मानले जाते. ह्यामुळे इराण एअरच्या विमानांना इंधन भरण्यासाठी इतरत्र वेगळा थांबा घ्यावा लागतो. आर्थिक निर्बंधांमुळे इराण एअरला नवी विमाने विकत घेणे देखील अशक्य बनले असून सध्या तिच्या ताफ्यातील विमानांचे सरासरी वय २३ वर्षे आहे. असे असून देखील इराण एअर जगातील सर्वात सुरक्षित विमानकंपन्यांपैकी एक मानली जाते.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: