इम्तियाज जलील
भारतीय राजकारणी
सय्यद इम्तियाज जलील हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते सध्याच्या १३व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाशी संबंधित आहेत. जलील हे वंचित बहुजन आघाडी-एआयएमआयएम युतीचे उमेदवार म्हणून एआयएमआयएम पक्षाच्या तिकिटावर १७व्या लोकसभेसाठी औरंगाबाद मतदारसंघातून जिंकले आहेत.[१] त्यांनी चार वेळा औरंगाबादचे खासदार राहीहेल्या चंद्रकांत खैरेंचा पराभव केला. जलील हे महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम खासदार आहेत.
इम्तियाज जलील | |
विद्यमान | |
पदग्रहण इ.स. २०१९ | |
मागील | चंद्रकांत खैरे |
---|---|
मतदारसंघ | औरंगाबाद |
महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
| |
विद्यमान | |
पदग्रहण इ.स. २०१४ | |
मतदारसंघ | औरंगाबाद मध्य |
जन्म | १ जानेवारी, १९६८ |
राजकीय पक्ष | ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन |
धर्म | इस्लाम |