इमाम अली मशीद (अरबी: حرم الإمام علي) ही इराक देशाच्या नजफ शहरामधील एक मशीद आहे. इस्लाम धर्माच्या शिया पंथीय लोकांसाठी ही मशीद तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात पवित्र धार्मिक स्थळ मानले जाते. मुहंमद पैगंबराचा भाऊ व शिया पंथाचा पहिला इमाम अली ह्याचे थडगे येथे आहे. दरवर्षी लाखो शिया पंथीय लोक येथे भेट देतात.

इमाम अली मशीद

ही मशीद स्रवप्रथम ९७७ साली बांधली गेली. त्यानंतर तिची बरेचदा डागडुजी करण्यात आली. १९९१ साली आखाती युद्धानंतर ह्या मशीदीत लपून बसलेल्या शिया बंडखोरांना हुसकावण्यासाठी सद्दाम हुसेनच्या रिपब्लिकन गार्ड सैन्याने इमाम अली मशीदीची मोडतोड केली होती. २००३ सालच्या इराकवरील अमेरिकन हल्ल्यानंतर येथे अनेकदा बॉंबस्फोट झाले आहेत.

बाह्य दुवे

संपादन

31°59′46″N 44°18′51″E / 31.996111°N 44.314167°E / 31.996111; 44.314167