इटालिक लीग किंवा सर्वात पवित्र लीग हा व्हेनिसमध्ये ३० ऑगस्ट, १४५४ रोजी लोदीच्या तहानंतर काही महिन्यांत झालेला आंतरराष्ट्रीय करार होता. यामध्ये पोपची राज्ये, व्हेनिस प्रजासत्ताक, मिलानची डची, फिरेंझेचे प्रजासत्ताक आणि नेपल्से राज्य यांनी भाग घेतला होता. या करारामुळे पुढील ४० वर्षे इटलीमध्ये शांतता पसरली आणि त्यामुळे आर्थिक व सामाजिक भरभराटही झाली. या युतीमुळे झालेल्या स्थिरते मुळे फिरेंझेमधून रिनैसाँचे लोण सर्वत्र पसरले.

१४९४मध्ये हा करार मोडकळीस आल्यानंतर इटालियन युद्धे सुरू झाली व इटलीमध्ये पुन्हा एकदा अस्थिरता माजली.

संदर्भ

संपादन