इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी
इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी (आयएमएस) ही गणितातील अभ्यास आणि संशोधनाच्या प्रचारासाठी समर्पित असलेली भारतातील सर्वात जुनी संस्था आहे. सोसायटीची स्थापना एप्रिल १९०७ मध्ये व्ही. रामास्वामी अय्यर यांनी केली. तिचे मुख्यालय पुणे येथे आहे.
स्थापना | 1907 |
---|---|
मुख्यालय | Pune, Maharashtra, India |
President | S. D. Adhikari |
संकेतस्थळ | https://www.indianmathsoc.org/ |
या संस्थेने तात्पुरत्या अॅनालिटिक क्लब नावाने आपले उपक्रम सुरू केले आणि लवकरच नाव बदलून इंडियन मॅथेमॅटिकल क्लब करण्यात आले. १९१० मध्ये नवीन घटन स्वीकारल्यानंतर, सोसायटीने तिचे सध्याचे नाव, म्हणजे, इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी प्राप्त केले. संस्थेचे पहिले अध्यक्ष बी. हनुमंत राव होते.