ऑलिंपिक

मुख्यालय: लौसन, स्वीज़लेंड
(आॅलिम्पिक या पानावरून पुनर्निर्देशित)

ऑलिंपिक हा क्रीडा प्रकारांचे आयोजन असलेला जागतिक स्पर्धात्मक उपक्रम आहे.[]या संकल्पनेचा उगम ग्रीस या देशात झाला आहे.

इतिहास

संपादन

ग्रीस या देशात क्रीडा प्रकारांना विशेष महत्व दिले जाते.इसवी सन पूर्व आठव्या शतकात ग्रीसमध्ये या खेळांची सुरुवात झाली असा याचा इतिहास आहे. दर चार वर्षांनी तेथे होणाऱ्या स्पर्धेत विविध खेळाडू सहभाग घेत असत.[] खेळांचा इतिहास (ग्रीसमधील) ३००० वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळांची सुरुवात प्रथम १८९६ मधे अथेन्स येथे झाली.ग्रीस, जर्मनी, फ़्रान्स, इंग्लंड ,भारत सह १४ देशांचे खेळाडू या स्पर्धेत सामिल झाले होते. ६ एप्रिल १८९६ रोजी अमेरिकन खेळाडू जेम्स कोन्नोली याने पहिले ऑलिंपिक पदक जिंकले.

 
ध्वज

या स्पर्धेचे वैशिष्ट्य सांगणारे पाच वर्तुळे एकमेकात गुंतलेले असे प्रतीक आहे. यामध्ये आशिया, आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोप या देशांचा समावेश दाखविणारी ही पाच वर्तुळे आहेत.निळा, पिवळा, काळा, हिरवा आणि लाल रंगांची ही वर्तुळे विविध देशांचे प्रतिनिधित्व करतात असे मानले जाते.[]

आफ्रिकापिक खेळांचे यजमान देश==

 
उन्हाळी ऑलिंपिक स्थानांचा नकाशा. एकदा यजमानपद भुषवलेले देश हिरव्या तर दोन व अधिक वेळा हा मान मिळालेले देश निळ्या रंगाने दर्शवले आहेत.
 
हिवाळी ऑलिंपिक स्थानांचा नकाशा. एकदा यजमानपद भुषवलेले देश हिरव्या तर दोन व अधिक वेळा हा मान मिळालेले देश निळ्या रंगाने दर्शवले आहेत.
ऑलिंपिक यजमान शहरे[]
वर्ष उन्हाळी ऑलिंपिक हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
क्र. शहर क्र. शहर
१८९६   अथेन्स, ग्रीस
१९००   पॅरिस, फ्रान्स
१९०४   सेंट लुईस, मिसूरी(), अमेरिकेची संयुक्त संस्थाने
१९०६ मध्य   अथेन्स, ग्रीस
१९०८   लंडन, युनायटेड किंग्डम
१९१२   स्टॉकहोम, स्वीडन
१९१६   बर्लिन, जर्मनी
पहिल्या महायुद्धामुळे रद्द.
१९२०   ॲंटवर्प, बेल्जियम
१९२४   पॅरिस, फ्रान्स   शॅमोनी, ओत-साव्वा, फ्रान्स
१९२८   अ‍ॅम्स्टरडॅम, नेदरलँड्स   सेंट मॉरिट्झ, ग्राउब्युंडन, स्वित्झर्लंड
१९३२ १०   लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने   लेक प्लॅसिड, न्यू यॉर्क, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
१९३६ ११   बर्लिन, जर्मनी   गार्मिश-पाटेनकर्शन, जर्मनी
१९४० १२   तोक्यो, जपान
  हेलसिंकी, फिनलंड
दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द.
  सप्पोरो, जपान
  सेंट मॉरिट्झ, ग्राउब्युंडन, स्वित्झर्लंड
  गार्मिश-पाटेनकर्शन, जर्मनी
दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द.
१९४४ १३   लंडन, युनायटेड किंग्डम
दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द.
  कोर्तिना द'अम्पिझ्झो, व्हेनेतो, इटली
दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द.
१९४८ १४   लंडन, युनायटेड किंग्डम   सेंट मॉरिट्झ, ग्राउब्युंडन, स्वित्झर्लंड
१९५२ १५   हेलसिंकी, फिनलंड   ओस्लो, नॉर्वे
१९५६ १६   मेलबर्न, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया +
  स्टॉकहोम, स्वीडन ()
  कोर्तिना द'अम्पिझ्झो, व्हेनेतो, इटली
१९६० १७   रोम, इटली   लेक टाहो, कॅलिफोर्निया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
१९६४ १८   टोक्यो, जपान   इन्सब्रुक, ऑस्ट्रिया
१९६८ १९   मेक्सिको सिटी, मेक्सिको १०   ग्रेनोबल, फ्रान्स
१९७२ २०   म्युनिक(), पश्चिम जर्मनी ११   सप्पोरो, जपान
१९७६ २१   मॉंत्रियाल, क्वेबेक, कॅनडा १२   इन्सब्रुक, ऑस्ट्रिया
१९८० २२   मॉस्को, सोव्हिएत संघ १३   लेक प्लॅसिड, न्यू यॉर्क, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
१९८४ २३   लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने १४   सारायेव्हो, युगोस्लाव्हिया
१९८८ २४   सोल, दक्षिण कोरिया १५   कॅल्गारी, आल्बर्टा, कॅनडा
१९९२ २५   बार्सिलोना, स्पेन १६   आल्बर्तव्हिल, साव्वा, फ्रान्स
१९९४ १७   लिलहामर, नॉर्वे
१९९६ २६   अटलांटा, जॉर्जिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
१९९८ १८   नागानो, जपान
२००० २७   सिडनी, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया
२००२ १९   सॉल्ट लेक सिटी, युटा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
२००४ २८   अथेन्स, ग्रीस
२००६ २०   तोरिनो, इटली
२००८ २९   बीजिंग(), चीन
२०१० २१  , व्हॅंकूव्हर, ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा
२०१२ ३०  लंडन, युनायटेड किंग्डम
२०१४ २२   सोत्शी, रशिया
२०१६ ३१   रियो दि जानेरो, ब्राझिल
२०१८ २३   प्यॉंगचॅंग, दक्षिण कोरिया
२०२४ ३२   पॅरिस, फ्रान्स
आधी शिकागोला दिली गेलेली ही स्पर्धा सेंट लुईसला हलवण्यात आली.
काही खेळ स्टॉकहोममध्ये भरवले गेले.
काही खेळ हॉंग कॉंगमध्ये भरवले गेले.

संदर्भ

संपादन
  1. ^ "ऑलिंपिक क्रीडासामने". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2024-08-04 रोजी पाहिले.
  2. ^ "Paris Olympic 2024: ऑलिंपिक किती वर्षांनी होतं? आधुनिक ऑलिंपिकला सुरुवात कधी झाली?". BBC News मराठी. 2024-07-23. 2024-08-04 रोजी पाहिले.
  3. ^ "ऑलिम्पिकच्या लोगोमध्ये पाच वर्तुळ का असतात? काय आहे याचा अर्थ; जाणून घ्या". Loksatta. 2024-07-23. 2024-08-04 रोजी पाहिले.
  4. ^ "ऑलिंपिक खेळ" (registration required). 2009-04-02 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
  • ऑलिंपिक अधिकृत संकेतस्थळ [१]