अहोम सैन्यात घोडदळ, पायदळ तसेच नौदलचा समावेश होता. अहोम राज्याचे सैन्य पाईक पद्धत मिलिशियावर (सैन्यात नसलेल्या परंतु लष्करी शिक्षण घेतलेल्या नागरिकांची सेना) आधारीत होती. अहोम साम्राज्य स.न. १२२२ ते १८२४ पर्यंत अस्तित्वात होते. १९व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत अहोम साम्राज्याकडे पुर्णवेळ सैनिकांची तुकडी नव्हती. पूर्णानंदन बुरहागोहाईन यांनी मोमोरिया बंडखोरीला काबूत ठेवण्याच्या बाबतीत कॅप्टन थॉमस वेल्शच्या शिपायांची प्रभाव लक्षात घेउन पुर्णवेळ सैनिकांची तुकडी तयार केली.

आहोम सैन्य
सक्रिय कार्यकाळ स.न. १२२२ ते १८२४
देश आसाम, ईशान्य भारत
प्रकार रॉयल आर्मी
लढाया सराईघाट, इटाखुली इतर
सेनापती
उल्लेखनीय
सेनापती
लछित बोरफुकान

अहोम सैन्य बंगालचा सुलतान आणि मुघल साम्राज्य यांच्याशी लढत होते. तसेच दक्षिणेकडील कोनबंग (बर्मा) घराण्याशीसुद्धा संघर्ष होता. या सैन्याने तुर्बकच्या (१५३२) सैन्याचा निर्णायक पराभव केला होता. मुघल साम्राज्याच्या विरोधात सराईघाटची लढाई (इ.स. १६७१), आणि इटाखुलीची लढाई (१६८२) देखील अहोम सैन्याने जिंकली होती [] यामुळे आसाममधून मुघल सैन्याची हकालपट्टी झाली होती. या सैन्याचे मोठे अपयश म्हणजे चिलराईची (१६५३) लढाई होती. ही लढाई मीर जुमला द्वितीय (१६६२)च्या सैन्याच्या विरोधात होती तसेच आसामवर (१८१७, १८१९, १८२१) बर्मी आक्रमण झाले . अहोम राज्य पश्चिमेकडील सर्व आक्रमणांना रोखू शकला असला तरी, हे दक्षिणेकडील एकमेव महत्त्वपूर्ण आव्हानाला भिडले आणि ते नष्ट झाले.

संघटना

संपादन

अहोम सेना त्याच्या पायक प्रणालीतील सदस्यांच्या (सक्तीच्या) सहभागावर आधारित होती. पाईक मध्ये ४ (आणि नंतर ३) सभासदांचा गट असायचा. यातील किमान एक पाईक कोणत्याही वेळी लष्करी किंवा सार्वजनिक सेवेमध्ये असायचा. प्रत्येक पाईक सदस्याला राज्याकडून शेतीसाठी जमीन दिली जात असे. पाईक सेवेच्या काळात, त्याच्या गटातील बाकीचे सदस्य त्याच्या जमीनीकडे लक्ष देत असत. पंधरा ते पन्नास वर्षे वयोगटातील पुरुष पाईक प्रणालीचे अनिवार्य सदस्य असत. म्हणूनच संपूर्ण जनतेने एक प्रशिक्षित मिलिशिया तयार केली ज्यावर अहोम आर्मी आधारित होती; आणि युद्धांच्या वेळीही शेती व इतर आर्थिक कामे चालूच रहात होते.

पायक अधिकारी
पायक अधिकारी पायकांची संख्या
फुकान ७०००
राजखोवा ३०००
हजारिका १०००
सैकिया १००
बोरा २०

संदर्भ

संपादन
  1. ^ "In the Battle of Itakhuli in September 1682, the Ahom forces chased the defeated Mughals nearly one hundred kilometers back to the Manas river. The Manas then became the Ahom-Mughal boundary until the British occupation." (Richards 1995, p. 247)

नोट्स

संपादन
  • रिचर्ड्स, जॉन एफ. (1995). मुघल साम्राज्य. केंब्रिजः केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस. ISBN 0521566037. 26 जानेवारी 2013 रोजी पुनर्प्राप्त.