अश्वगंधा

(आस्कंध या पानावरून पुनर्निर्देशित)

अश्वगंधा (इंग्रजीत Winter cherry; शास्त्रीय नाव Withania somnifera) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिला आस्कंद, अश्वगंधा, ढोरकामुनी, ढोरगुंज, कामरूपिनी या नावाने सुद्धा ओळखले जाते. आयुर्वेद उपचारांमधील ही महत्त्वाची वनस्पती आहे. हिला इंडिअन जिनसॅंग म्हणून ओळखले जाते. वृष्य व वाजीकर अशी ही वनस्पती आहे. 'बुढापे का सहारा अश्वगंधा विधारा।।' अशी एक म्हण प्रसिद्ध आहे.

अश्वगंधा
अश्वगंधा
फुल
फळ

ही एक लहान, कोमल बारमाही झुडूप आहे जी 35-75 सें.मी. पर्यंत उंच वाढते. हिच्या शाखा मध्यवर्ती खोडापासून चोहोबाजूला विस्तृत असतात. पाने गडद हिरव्या रंगाची, निस्तेज पांढरा रंग वरून लावल्या सारखी, लंबवर्तुळाकार असतात. पाने साधारणत: 10-12 सेमी (4 ते 5 इंच) लांब असतात. फुले लहान, हिरव्या आणि बेल (घंटा)आकाराचे असतात. पिकलेली फळे केशरी-लाल रंगाची असतात. या फळांना कामुन्या असे बोलीभाषेत म्हटलं जातं. प्रत्येक फळात अनेक छोटछोट्या बिया असतात. ही फळे पक्षी किटक आणि मुंग्या आवडीने खातात. बियांची उगवण क्षमता कमी असते. झाडाची मुळे 30-45 सेमी लांब, मुळा सारख्या, 2.5-3.5 सेमी जाड असतात. मुळांचा बाह्य रंग तपकिरी असून, आतून पांढरा असतो. या मुळ्यांचा उपयोग आयुर्वेदात प्रामुख्याने केला जातो.

आयुर्वेदामध्ये अश्वगंधा ह्या वनस्पतीला खुप महत्व आहे. अश्वगंधा ह्या वनस्पतीचे फायदे आरोग्यासाठी भरपूर आहेत. तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी प्रामुख्याने अश्वगंधा ह्या वनस्पतीचा वापर आयुर्वेदामध्ये केला जातो. अश्वगंधा ची मुळे पावडर स्वरूपात किंवा मुळ देखील आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळतात. शिवाय अश्वगंधा च्या टॅबलटे देखील उपलब्ध आहेत.अश्वगंधा ही इतर औषधे तयार करण्यासाठी देखील उपयोगी ठरते.

मुळ्यातील रासायनिक घटक
अश्वगंधाच्या मुळांमध्ये अल्कॉइड्सची तीव्रता 0.13 ते 0.31 टक्के आहे. त्यात लक्षणीय व्हिडानिन अल्कालाईइड्स आहेत, जे एकूण अल्कधर्मीयांपैकी 35 ते 40 टक्के आहेत.

हिच्या दोन जाती असतात.

  1. देशी- ही जंगलामध्ये आढळते.
  2. ही पेरणी करून उगविली जाते. हिच्या मुळांचा वापर आयुर्वेदचिकित्सेमध्ये केला जातो.

बकरीच्या मांसापासून तयार केलेला रस्सा व अश्वगंधा यांचा वापर करून बनवलेलेअजाअश्वगंधादि लेहम् नावाचे औषध आयुर्वेद चिकित्सेमधे वजनवर्धक व शक्तिवर्धक म्हणून वापरतात.

लागवड

संपादन

अश्वगंधा ची मोठ्या प्रमाणावर शेतीद्वारे लागवड केली जाते.

आयुर्वेदिक उपयोग

संपादन

अश्वगंधाचे रसपंचक

संपादन
  • रस - मधुर, तिक्त, कषाय
  • विपाक- मधुर
  • वीर्य- उष्ण
  • गुण- लघु, स्निग्ध
  • कर्म- शुक्र, बल्य

संदर्भ

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन