आवर्तन - भारतीय संगीतातील स्थूलता आणि सूक्ष्मता
आवर्तन-भारतीय संगीतातील स्थूलता आणि सूक्ष्मता हे तबलावादक सुरेश तळवलकर यांनी तबलावादनावर लिहिलेले एक मराठी पुस्तक आहे.
या पुस्तकात तळवलकरांनी तबलावादनाच्या कलेबरोबरच त्या वाद्यामागचे शास्त्रही विशद केले आहे. यात तबल्याच्या प्रकृतीची, ताकदीची आणि वैशिष्ट्यांची ओळख करून दिलेली आहेत तसेच त्यावर भाष्यही केलेले आहे.
यात श्रेष्ठ तबलावादकांच्या विशेषतांचा उल्लेख व उदाहरणे आहेत. यात अस्सल मराठी संकल्पना आणि शब्द वापरलेले आहेत.