आर्थिक विकासदर म्हणजे एखाद्या अर्थव्यवस्थेमधील सेवांच्या आणि उत्पादित मालाच्या मूल्याच्या वाढीचा दर होय. आर्थिक विकासदर साधारणपणे त्या अर्थव्यवस्थेच्या वार्षिक सकल उत्पन्नामधील वाढीच्या टक्केवारीच्या दरात मोजतात. हा दर चलनवाढीच्या दराला अनुरूप करून घेतात. अर्थात, सेवा व मालाच्या मूल्यामधून चलनवाढीचा परिणाम बाजूला काढून हा दर मोजतात. आर्थिक विकासदर हा सर्वसाधारणपणे एखाद्या देशामधील सरासरी राहणीमानामधील होणाऱ्या सुधारणेचा दर्शक आहे.