आरे दूध वसाहत मुंबईच्या गोरेगाव उपनगराचा एक भाग आहे. १९४९ साली वसवलेल्या या भागात आरे दूध या कंपनीचा दूध एकत्रीकरण व शुद्धीकरण करण्याचा कारखाना आहे. याच्या आसपास बगीचे, तलाव तसेच फिरण्यासाठीच्या जागा आहेत.
या भागात अंदाजे १,२८७ हेक्टर क्षेत्रात ३२ पशुपालनक्षेत्रे असून त्यात सुमारे १६,००० दुभती जनावरे आहेत.