हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कवठे महंकाळ तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव कित्येक कालखंडापासून इथे वसले आहे. मिरज पंढरपुर हायवेपासून दोन ते अडीच किमी अंतरावर तर आगळगाव, केरेवाडी, नागज, ढालगाव आणि लंगरपेठ अशा गावांच्या मध्यभागी हे गाव वसलेले आहे. ह्या गावाची कीर्ती पूर्ण देशभरात पसरली आहे. मध्यप्रदेश पासून तमिळनाडु पर्यंत सर्वत्र हया गावाची ख्याती आहे . ते म्हणजे येथील बिरोबा देवस्थानमुळे; बिरोबा हे धनगर तसेच इतर बहुजन बांधवाचे आरध्य दैवत आहे. त्यामुळे देशभरातील सर्व बहुजन बांधव इथे दर्शनासाठी येत असतात.