आरारूट ही एक औषधी वनस्पती आहे.

आरारुटचा कांदा

वनस्पतीचे वर्णन

संपादन

आरारुट ही वनस्पती हळद या वनस्पतीसारखी दिसते. परंतु या वनस्पतीची पाने अधिक गडद हिरवी असतात. या वनस्पतीची मुळे पांढरी शुभ्र रंगाची असतात.

आरारूट या वनस्पतीच्या कंदांपासून सत्त्व तयार करतात. हे सत्त्व पचण्यास हलके असल्याने त्याची खीर करून लहान मुलांना, वृद्धांना आणि आजारी व्यक्तींना दिली जाते. तोंड आले असता आरारूटचे सत्त्व घेतले जाते. तसेच हे पित्तशामक आहे.

लागवड

संपादन

आरारूटची लागवड ही मे महिन्यात केली जाते. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात याची काढणी केली जाते.