आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती

(आयसीसी या पानावरून पुनर्निर्देशित)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती ही क्रिकेट ह्या खेळाची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. इ.स. १९०९ मध्ये इंग्लंडचा ध्वज इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया आणि Flag of South Africa.svg दक्षिण आफ्रिका या देशांनी इंपेरियल क्रिकेट संघटनेची (Imperial Cricket Conference) स्थापना केली. इ.स. १९६५ मध्ये या संघटनेचे नाव बदलून आंतररष्ट्रीय क्रिकेट सभा (International Cricket Conference) असे ठेवण्यात आले. इ.स. १९८९पासून सध्याचे नाव उपयोगात आणले जात आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
International Cricket Council

लोगो
लोगो

लघुरूप आय.सी.सी.
ध्येय Great Sport Great Spirit
स्थापना १५ जून १९०९
मुख्यालय दुबई, संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती
सदस्यता १०६ सदस्य देश
चेअरमन एन. श्रीनिवासन
वेबसाईट icc-cricket.com

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनचे ९७ सदस्य देश आहेत. आय.सी.सी. सामन्यांसाठी पंच व पर्यवेक्षक यांची नियुक्ती करते.

अनुक्रमणिका

संघटन स्वरुपसंपादन करा

सदस्य देशसंपादन करा

सदस्य देश तीन विभागात विभागल्या गेलेले आहेत.

  • पूर्ण सदस्य - १० देश
  • असोसियेट सदस्य - ३२ देश
  • ॲफिलियेट सदस्य - ५५ देश

प्रादेशिक संघटनासंपादन करा

प्रादेशिक संघटनांचे काम क्रिकेट स्पर्धाचे आयोजन, प्रोत्साहन व खेळाचा विकास वेगवेगळ्या देशात करणे आहे.

महत्वाच्या स्पर्धासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा