आयर्न ऑक्साइड
आयर्न ऑक्साइड हे लोखंड (आयर्न) आणि प्राणवायू (ऑक्सिजन) या दोन मूल तत्त्वांच्या संयुगांना दिलेले नाव आहे. आयर्न ऑक्साइड आणि आयर्न ऑक्सिहायड्रॉक्साइड प्रकारची सोळा ज्ञात संयुगे आहेत. ही संयुगे निसर्गात मुबलक प्रमाणात आढळतात. लोखंडाच्या खनिजात, गंज, नैसर्गिक रंग तसेच इतर अनेक ठिकाणी आढळणारी ही संयुगे माणसाच्या रक्तातील हीमोग्लोबिनमध्येही असतात.
प्रकार
संपादनऑक्साइड
संपादन- आयर्न(II) ऑक्साइड, वुस्टाइट (FeO)
- आयर्न(II,III) ऑक्साइड, मॅग्नेटाइट (Fe3O4)
- आयर्न(II,III) ऑक्साइड, (Fe4O5)[१]
- आयर्न(III) ऑक्साइड (Fe2O3)
- आयर्न(III) ऑक्साइड#आल्फा, हेमेटाइट (α-Fe2O3)
- आयर्न(III) ऑक्साइड#बेटा, (β-Fe2O3)
- आयर्न(III) ऑक्साइड#गॅमा, maghemite (γ-Fe2O3)
- आयर्न(III) ऑक्साइड#एप्सिलॉन, (ε-Fe2O3)
हायड्रोक्साइड
संपादन- आयर्न(II) हायड्रोक्साइड (Fe(OH)2)
- आयर्न(III) हायड्रोक्साइड (Fe(OH)3), (बर्नालाइट)
ऑक्साइड/हायड्रोक्साइड
संपादन- गोथाइट (α-FeOOH),
- एकेग्नेआइट (β-FeOOH),
- लेपिडक्रोसाइट (γ-FeOOH),
- फेरोक्झाइट (δ-FeOOH),
- फेरिहायड्राइट (Fe5HO8·4H2O approx.), or 5Fe2O3•9H2O, better recast as FeOOH•0.4H2O
- उच्च दाबातील FeOOH
- श्वेर्टमॅनाइट (Fe8O8(OH)6(SO)·nH2O किंवा Fe3+16O16(OH,SO4)12-13·10-12H2O)[२]
- हिरवा गंज (FeIIIxFeIIy(OH)3x+2y-z(A-)z; येथे A- is Cl- किंवा 0.5SO42-)