आयपीएल व्हॅलॉसिटी हा बीसीसीआयद्वारे २०१८ साली सुरू केलेल्या महिला ट्वेंटी२० चॅलेंज या क्रिकेट स्पर्धेत भाग घेणारा संघ आहे.

२०१८ साली बीसीसीआयने पुरुषांच्या आयपीएल धर्तीवर महिलांची एक स्पर्धा सुरू केली. २०१८ सालची स्पर्धा ही केवळ दोन आयपीएल सुपरनोव्हाझ आणि आयपीएल ट्रेलब्लेझर्स या संघांमध्ये झाली. २०१९ सालच्या आवृत्तीसाठी बीसीसीआयने आणखी एक संघ स्पर्धेत उतरवायचे ठरवले. २०१९ सालच्या महिला ट्वेंटी२० चॅलेंज स्पर्धेत आयपीएल व्हॅलॉसिटीने पदार्पण केले. २०१९ आणि २०२० साली मिताली राज हिने सदर संघाचे कर्णधारपद सांभाळले. २०२२ सालापासून दीप्ती शर्मा या संघाची कर्णधार आहे.

पदार्पणच्या आवृत्तीमध्येच व्हॅलॉसिटीने अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता परंतु अंतिम सामन्यामध्ये आयपीएल सुपरनोव्हाझने व्हॅलॉसिटीचा पराभव करत जेतेपद पटकावले.