सामर्थ्र्यशाली आयजेन पू[]

डायिंग विथ डिग्निटी: आयजेन पूचा लढा

मृत्यू सन्मानपूर्वक : आयजेन पूचा लढा

एकदा मुक्त अर्थव्यवस्था स्विकारली की त्याचे बरेवाईट परिहार्य परीणाम कुटुंबव्यवस्थेवर देखील होतात. भारताने ही व्यवस्था स्विकारायला जवळपास 20 वर्ष होत आहेत. अनेकांना वेगवेगळया संधी उपलब्ध झाल्याने या व्यवस्थेचे गोमटी फळे चाखता आली. आता मात्र या अर्थव्यवस्थेचे बळी देशभरातले वृद्ध ठरत आहेत. संपन्न जीवनमान मिळवण्याची अहमहमिका लागली आहे. वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी, शैक्षणिक खर्चाचा बोजा उचलता यावा यासाठी घरातील स्त्री पुरुष दोघेही नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडले. कार्पोरेट क्षेत्रातल्या रॅटरेसमध्ये अपरीहार्यपणे उतरले. दोघांनीही नोकरी केल्यामुळे घरी राहणारी त्यांची मुलं आणि वृद्ध आईवडील यांच्या समस्या निर्माण झाल्या. पैसे कमावणे याला पर्याय नाही तेव्हा मुलांची रवानगी पाळणाघर, रहिवाशी शाळा, पूर्णवेळ शाळा, या पर्यायांनी बऱ्याच अंशी कमी झाली. मात्र वृद्धापकाळाने जर्जर झालेल्या आईवडिलांची असहाय्यता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही लहान शहरांमधून मुले मोठया शहरात किंवा परदेशी गेले तर वृद्धांच्या समस्येला पारावार राहत नाही. नोकरी करणाऱ्या स्त्री-पुरुषांची मधल्यामध्ये घुसमट होते. या जनरेशनला अमेरीकेमध्ये ‘सॅण्डवीच जनरेशन’ म्हणले जाते. घरातले वृद्ध आणि त्यांचे मुलं या दोघांमध्ये ही पिढी पिचलेली दिसते. प्रचंड मानसिक ओढाताण सहन करते.

आयजेन पू, अमेरिकन चळवळीची कार्यकर्ती आहे. गेल्या दशकभरात या प्रभावशाली स्त्रीचे नाव सातत्याने चर्चेत आहे. घरगुती काम करणाऱ्या मोलकरणींची तिने संघटना बांधली. अमेरिकेतील मोलकरणी अनोंदणीकृत असल्यामुळे त्यांच्या समस्या बिकट होत्या त्यांच्या अत्यंत दुर्लक्षित प्रश्नांकडे आयजेननी सगळयांचे लक्ष वेधले. प्रथमदर्शनी बघता हा लढा मोलकरणींच्या हक्कासाठी केलेला लढा आहे. अमेरिकन प्रशासनाला त्यांच्या समस्यांची जाणिव करून देणे हा मुख्य उददेश समोर आयजेनने या महिलांच्या संघटनेला सुरुवात केली. याच समस्येची दुसरी अदृश्य बाजु देखील आहे. बहुतांश मोलकरणी वृद्धांची काळजी घेण्यासाठी विशेष करून नेमल्या जातात. अमेरिकेमध्ये वृद्धांची संख्या लक्षणीय आहे. उत्कृष्ट दर्जाचे जीवनमान आणि आधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे एकंदर सरासरी वयोमानामध्ये वाढ झाली आहे. वृद्धांना जिवनाच्या संध्याकाळी मुलाबाळासमवेत, हक्काच्या घरात सन्मानाने मरायचे असते. वृद्धांना नर्सिंग होम आवडत नाहीत. अमेरिका ही मुक्त अर्थव्यवस्था आहे. भांडवली अर्थव्यवस्थेचा नेहमीच पुढाकार केला त्यामुळे चांगल्या  जिवनमानासाठी नोकरी करणे क्रमप्राप्त ठरते. वृद्ध होत जाणाऱ्या आई-वडिलांची सेवा करणे, संगोपन करणे शक्य होत नाही. वृद्धांसमोर नर्सिंगहोम शिवाय इतर पर्याय राहत नाही.

आयजेन या दोन्ही समस्यांकडे डोळसपणे बघते. या दोन्ही समस्यांची अदृश्य कडी तिने बरोबर शोधली आहे. या दोन्ही समस्या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत आणि सॅण्डवीच जनरेशनसाठी पाठींबा देताना मोलकरणींची संघटना मानवी सेतू बनु शकते हे तिने बरोबर ओळखले. वृद्धांचे मरण, त्यांचा वृद्धापकाळ सन्मानाचा व्हायचा असेल तर अधिकाअधिक स्त्रियांनी हे काम स्विकारायला हवे. परंतु मोलकरणींना मिळणारे अल्प वेतन आणि असुरक्षितता यामुळे केवळ गरजवंत स्त्रियाच नाईलाजाने मोलकरणीचे काम स्विकारतात असे आयजेनचे निरीक्षण होते. घरगुती काम करणाऱ्या स्त्रियांना हक्क सेवाशर्ती आणि सुरक्षितता मिळाली तर अधिक स्त्रिया या व्यवसायाकडे वळतील पर्यायाने अनेक वृद्धांना दिलासा मिळेल. अमेरिकेच्या फार मोठया लोकसंख्येला ‘एज ऑफ डिग्नीटी’ बहाल करणारी आयजेन त्यामुळे गेल्या दशकातील सामर्थ्यशाली ठरली आहे.

आयजेन पू मुळची तैवानची, तिचे कुटुंब अमेरिकेला विस्थापित झाले होते. आयजेनच्या वडिलांचे मुळ तैवानचे आर्थिक सुबत्ता आणि स्थैर्य मिळवण्यासाठी ते अमेरिकेला गेले. त्यांचे आईवडीलही पुढे मुलाकडे येऊन राहिले. आयजेनची आईचे मूळ चीनचे. दुसऱ्या महायुद्धानंतर आयजेनचे कुटुंब तैवानला गेले आणि तिथुन पुढे अमेरिकेला स्थायिक झाले. आयजेनचा जन्म 1974[] (तारीख महिना समजू शकले नाही)मध्ये पिटर्सबर्ग येथे झाला. कुटुंबाची थोरली मुलगी म्हणून आईवडील व दोन्ही घरचे आजी आजोबा आयजेनवर खूप प्रेम करीत असत. मात्र, पुढे तिच्या आईवडिलांचा काही कारणावरून बेबनाव होवून ते वेगळे झाले. आयजेनच्या बहीण आणि आईसह ते सगळे आईच्या माहेरी येऊन राहिले. या घटस्फोटाचा खरा परिणाम आयजेनच्या वडिलांकडूनच्या आजीआजोबावर तीव्रतेने झाला. आजारी आजी होती तोपर्यंत तिच्या आजोबाचे ठिक चालले होते मात्र आजी वारली आणि आजोबा एकटे पडले. तिचे आजोबा अतिशय वक्तशीर आणि खंबीर होते. मात्र त्यांनाही पुढे अनेकदा पक्षाघाताचे झटके आले. शेवटी ते अंथरुणाला खिळले. त्यांची काळजी घेणारे वडिलांच्या घरात कुणीच नव्हते. वडील नोकरीनिमित्त घराबाहेर असत अशावेळी काळजी घेण्यासाठी आजोबांना नर्सिंग होममध्ये ठेवण्यात आले. नर्सिंग होममध्ये वृद्धांना हळूहळू विष देऊन मारण्यात येते असा ठाम विश्वास त्यांना होता. अनेकदा आयजेन आजोबांना भेटायला जात असे तेव्हा तिला ते दिवसेंदिवस अधिकच खचत गेल्याचे दिसत होते. शेवटी ते आयजेनलाही ओळखत नव्हते. त्यांचा दुर्देवी मृत्यू संवेदनशील आयजेनला चटका लावून गेला. वृद्धाच्या एकटेपणाची आणि परावलंबित्वाची मोठीच समस्या तिला जाणवू लागली.

घटस्फोटामुळे आयजेनच्या आईच्या अडचणीही अनेक पटींनी वाढल्या त्यांनी रसायनशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवली होती आणि त्यांना निष्णांत ऑन्कोलॉजिस्ट बनायचे होते पुढील शिक्षणासाठी त्यांनी दोन कॅन्सर सेंटर्समध्ये नाव नोंदवले होते. तिथे शिकत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये आयजेनची आई एकटीच दोन मुलींची आई होती. मुलींचे सगळे सांभाळून, घरातील सगळी कामे वक्तशीर करून त्या शिक्षण घेत होत्या. आजीची आयजेनच्या आईला पुष्कळच मदत होत असे. याशिवाय आजीच्या कडे मिसेस सन नावाची एक केर गिव्हर देखील होती. घरातील या तीन कष्टाळू स्त्रिया आयजेनने बघितल्या होत्या.

आयजेनच्या आजुबाजुलाही अनेक कष्टकरी स्त्रिया ती बघत असे. घरातील तीन स्त्रिया आणि एकंदर आजुबाजूच्या स्त्रियांकडे बघून स्त्रिया समाजासाठी दिशादर्शक असे तिचे मत झाले. त्या जन्मजात संशोधक असतात. त्यांचा समाजासाठीचा त्याग मोठा असतो, त्यांच्या त्यागाची कशाशीही तुलना होऊ शकत नाही. या स्त्रिया आपल्या कामाचा कोणताही डांगोरा करीत नाहीत. कुटुंबासाठी केलेला त्याग त्या आपले कर्तव्य मानतात. मात्र, त्यांची दखल घेण्याची गरज कोणालाही वाटत नाही. त्यांचे काम ‘थकलेस जॉब’ ठरते. अशी निरीक्षणे आयजेनने केली.

घरगुती काम करणाऱ्या स्त्रियांच्या समस्या अधिक बिकट होत्या. अनेकदा मोबदल्यापेक्षा जास्त काम त्यांच्याकडून करून घेतले जाई. अनेकदा त्यांचा लैंगिक छळ होत असे हे सगळे बघून अस्वस्थ आयजेनने वयाच्या बावीसाव्या वर्षी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. कामासाठी इतर देशातून पळून आलेल्या विस्थापित स्त्रियांचे संघटन तिने 1986 मध्ये करायला सुरुवात केली. सन 2000 साली न्यू यॉर्कमध्ये न्यू यॉर्क वुमेन्स कॉन्फरन्स भरली. त्यानंतर लगेचच तिने डोमेस्टिक वर्कर्स युनायटेडची स्थापना केली ही संघटना घरगुती काम करणाऱ्या, विस्थापित, अकुशल स्त्री कामगारांचे संघटन होते. या सारख्याच अनेक छोटयामोठया संघटनांचे काम अमेरिकाभर सुरू होते. संघटनेमुळे अमेरिकन व्यवस्थेचे आणि समाजाचे लक्ष या संघटनेमध्ये नाव नोंदवावे यासाठी आयजेन आणि तिच्या सहकारी मैत्रिणींनी राज्याराज्याचे दौरे केले. अनेक छोटया मोठया संघटनानांही एकत्र डोमेस्टीक वर्कर्स युनायटेडच्या छत्रीखाली आणण्याचे कामही त्यांनी केले. संघटन मजबूत झाले त्याची फळे लगेच मोलकरणींना चाखायला मिळाली. त्यांची अस्थिरता आणि असुरक्षितता जाऊन त्याजागी आत्मविश्वास निर्माण झाला. पोलीसी खाक्यामुळे लपतछपत भयग्रस्त काम करणाऱ्या स्त्रियांना सन्मानाने काम करण्याचा मार्ग सापडला. संघटनात्मक रेटयामुळे त्यांना विशीष्ट पुरेसा पगार, संरक्षण आणि आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी नोकरी देणाऱ्यांना बंधनकारक झाली हा या संघटनेचा पहिला मोठा विजय होता.

मात्र आयजेनच्या दृष्टीने खरी लढाई शासनाशी होती. मोलकरणीच्या हक्काची होती त्यांना कुशल कामगार म्हणून सेवाशर्ती लागू व्हाव्यात यासाठी तो लढा होता. पहिले काम आयजेनने विस्थापित स्त्रियांना नागरिकत्व मिळवून देण्याचे केले. कुशल कामगारांचा दर्जा मिळण्यासाठी स्त्रियांना प्रशिक्षीत करण्याची गरज होती. कारण सरकारच्या मते काळजी घेणे आणि संगोपन हे स्त्रियांचे नैसर्गिक कर्तव्य आहे. त्यासाठी त्यांना वेगळा दर्जा देण्याची गरज नाही आणि तो असेल तर स्त्रियांच्या रितसर प्रशिक्षणाला पर्याय नव्हता तो ही टप्पा आयजेनने संघटनेच्या मार्फत पार पाडला. तरीही घरगुती मोलकरणींना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी मोठी झुंज आयजेनला द्यावी लागली. स्त्रियांनाही वृद्धांच्या संगोपनासाठी विशिष्ट प्रकारचे नर्सिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. सगळे अंतर्गत अडथळे पार केल्यानंतर आयजेनने संघटनेचा लढा अधिक तीव्र केला.

तथापि, आयजेन वैयक्तिक आयुष्यात पुष्कळच सफर झाली. विवाहानंतर मुल होत नसल्याने तिने फर्टीलीटी ट्रिटमेंट घेतली. या प्रयत्नांना यश आले. आयजेन गरोदर राहिली. मात्र सततच्या दौऱ्यामुळे, खाण्यापिण्याच्या आबाळीमुळे तिचा गर्भपात झाला. याचे दुःख तिच्यासह सहकारी मैत्रिणींनाही झाले त्यांनी आपआपसात कामे वाटून घेऊन आयजेनला पूर्ण आराम होईल याची काळजी घेतली तरीही दुर्गम भागात तिने स्वतः जाणे क्रमप्राप्त असल्यामुळे प्रकृतीची हेळसांड हा जणू तिच्या कामाचाच भाग बनला होता.

2009 साली न्यू यॉर्कच्या गव्हर्नरनी या संदर्भाततले बिल पास करण्याचे तत्त्वत: मान्य केले. 31 ऑगस्ट 2010 रोजी डोमेस्टीक वर्कर्स बीलचे कायद्यात रूपांतर झाले ही चळवळ न्यू यॉर्क कॅम्पेन या नावाने प्रसिद्ध झाली. स्त्रियांनी रस्त्यावर उतरून विजयोत्सव साजरा केला एक मोठी लढाई आयजेन ने जिंकली अटीतटीच्या मोठया संघर्षाचे काम आयजेनने संघटनेमार्फत केले. 2010 मध्ये ती नॅशनल डोमेस्टीक वर्कर्स असोसिएशनची संचालिका झाली. त्यापाठोपाठ ‘केरिंग ॲक्रॉस नेशन्स’च्या त्या सहसंचालिका बनल्या. ‘मॅक ऑर्थर जिनीयस ॲवार्ड’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना मिळाला. विविध पारितोषिके तिला मिळाली.

आज आयजेन 44-45 वर्षांची आहे तिचा लढा अजुनही सुरू आहे. घरगुती मोलकरीण हा मानवी सेतू कुटुंबाला उध्वस्त होण्यापासून वाचवू शकतो हे ती जगाला परोपरीने सांगते आहे. अमेरिकन वृद्धांचा सन्मानाने जगण्याचा हक्कही याच माध्यमातून निर्माण करण्यात आयजेनला आलेले यश स्पृहनिय आहे.

जगभरात सामर्थ्यशाली ठरलेल्या स्त्रीने जगाला मानवी सेतूचा पर्याय उपलब्ध करून दिला. भारतातील वृद्धांची वाढत जाणारी संख्या, त्यांची होणारी हेळसांड, यावर आयजेनने काढलेला मार्ग स्विकारला जावू शकतो. वृद्धांचे स्थैर्य, सन्मान आणि कुशल घरकामगार यांच्यासाठी आयजेनने संघटनेच्या माध्यमातून केलेले कार्य भारतलाही निसंशय दिशादर्शक ठरतील.

  1. ^ a b धर्माधिकारी, ज्योती (२०१८). विश्वातील सामर्थ्यशाली स्त्रिया. औरंगाबाद: साकेत पुब्लिकेशन. p. 183. ISBN ISBN 978-93-5220-204-1 Check |isbn= value: invalid character (सहाय्य).