आप की अदालत हा एक भारतीय दूरचित्रवाणी कार्यक्रम आहे जो पद्मभूषण पत्रकार रजत शर्मा होस्ट करतो. हा कार्यक्रम १९९३ मध्ये सुरू झाला, २००४ पर्यंत दूरचित्रवाणी चॅनेल झी टीव्हीवर प्रसारित झाला, २००४ मध्ये झी न्यूझ वर आला आणि आता तो इंडिया टीव्हीवर प्रसारित होतो. हा भारताच्या दूरचित्रवाणी इतिहासातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या कार्यक्रमापैकी एक आहे, आणि २०१४ मध्ये नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर २१ वा वर्धापन दिन साजरा केला. शोचा सेट अप कोर्टरूमसारखा दिसतो, जिथे एका सन्मानीत व्यक्तिंना साक्षीदार म्हणून नियुक्त केले जाते आणि रजत शर्मा, होस्ट, वकील म्हणून काम करतात. कार्यक्रम क्षेत्रातील व्यक्तिंना बोलावून त्यांच्यासोबत चर्चा केली जाते. १९९५ मध्ये शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे शोमध्ये आले होते. इंडिया टीव्हीवर एक नियमित प्रत्येक आठवड्यात हा कार्यक्रम प्रसारीत केला जातो, या कार्यक्रमाने वीस वर्षांहून अधिक काळ दूरचित्रवाणी रेटिंगवर सातत्याने राज्य केले आहे. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींच्या मुलाखतीने सर्व रेटिंग रेकॉर्ड तोडले आणि भारतातील ७४ टक्के हिंदी बातम्या दूरचित्रवाणी दर्शकांना आकर्षित केले.[]

  1. ^ "Aap Ki Adalat".