अदी गोदरेज

मराठी उद्योजक
(आदि गोदरेज या पानावरून पुनर्निर्देशित)

आदि गोदरेज(जन्म ३ एप्रिल १९४२) हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपति आणि प्रसिद्ध औद्योगिक घराने गोदरेज समूह उद्योगाचे अध्यक्ष आहेत. आदि गोदरेज हे भारतातील अब्जाधीश उद्योगपतीपैकी एक आहे. आदि गोदरेज हे अनेक भारतीय उद्योग संघटनांचे अध्यक्षही होते. २०११ पासून ते इंडियन स्कूल ऑफ़ बिझनेस बोर्डाचे अध्यक्ष आहेत, तसेच कॉन्फ़ेडरेशन ऑफ़ इंडियन इंडस्ट्रीचे पूर्व अध्यक्ष होते. २०१८ पर्यंत, आदि गोदरेज यांची संपत्ती २.९ अब्ज डॉलर्स इतकी आहे.[]

अदी गोदरेज
जन्म ३ एप्रिल १९४२ (वय ८१)
मुंबई
निवासस्थान मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण ‘एम.आय.टी. स्लोअन स्कूल, जॉन कॅनन स्कूल
ख्याती भारतातील अत्यंत यशस्वी उद्योजक
धर्म पारसी
जोडीदार परमेश्वर गोदरेज
अपत्ये निसा गोदरेज, तान्या दुबाश

सुरुवातीचे जीवन

संपादन

आदि गोदरेज यांचा जन्म ३ एप्रिल १९४२ रोजी मुंबई येथे झाला. गोदरेज यांनी कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल येथून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले, तर एम.आय.टी. स्लोअन स्कूल ऑफ मॅनेजमेंट येथून एमबीए पूर्ण केले आणि एच एल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यांचा व्यवस्थापनाच्या अभ्यासचा वेळेस ते पाई लैम्ब्डा फाई आणि ताऊ बीटा पाई यांचे सदस्य होते.[] १९६३ मध्ये त्यांनी तो अभ्यासक्रम पूर्ण केला.

कारकीर्द

संपादन

अमेरिका मध्ये एमबीए पूर्ण केल्यानंतर ते भारतात परत आले, व त्यांनी आपल्या पारिवारिक व्यवसाया मध्ये सामील झाले. त्यांनी व्यवस्थापन संरचना आधुनिकीकरण केले आणि अंमलबजावणी प्रक्रियेत सुधारणा केली. आदि गोदरेज यांनी गोदरेज समूहाला नव्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांचे भाऊ नादिर गोदरेज हे गोदरेज इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि गोदरेज एग्रोवेटचे अध्यक्ष आहेत. त्यांचे चुलत भाऊ जमशेद गोदरेज हे गोदरेज अँड बॉयसचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी मिळून गोदरेज इंडस्ट्रीजचा विकास केला. ते अनेक भारतीय व्यापार व औद्योगिक संस्था आणि संघटनांचे अध्यक्ष आहेत.[][]

पुरस्कार

संपादन
  • राजीव गांधी पुरस्कार - २००२
  • द अमेरिकन इंडिया फाउंडेशन लीडरशिप इन फिलान्थ्रोप्य अवार्ड - २०१०
  • ‘इंटरप्रेन्योर ऑफ़ द इयर’ पुरस्कार - एशिया पसिफ़िक इंटरप्रेन्योरशिप सन्मान २०१०
  • ‘बेस्ट बिजनेसमैन ऑफ़ द इयर’ पुरस्कार जी.क्यू मेन ऑफ़ द इयर अवार्ड्स २०१०
  • जेआरडी टाटा कॉर्पोरेट लीडरशिप सन्मान - २०१० एआईएमए
  • मैनेजमेंट ऑफ़ द इयर पुरस्कार २०१० - २०११ बॉम्बे मैनेजमेंट एसोसिएशन
  • किम्प्रो प्लैटिनम स्टैण्डर्ड अवार्ड फॉर बिज़नस - २०११
  • अर्न्स्ट एंड यंग इंटरप्रेन्योर ऑफ़ द इयर २०१२
  • पद्म भूषण - २०१२

वैयक्तिक जीवन

संपादन

गोदरेज यांनी सामाजिक कार्यकर्त्या परमेश्वर गोदरेज यांचाशी विवाह केला. २०१६ मध्ये परमेश्वर गोदरेज यांचे निधन झाले. अदी गोदरेज मुंबई मध्ये राहतात. त्यांना तान्या दुबाश, निसा गोदरेज आणि पिरोजशा गोदरेज ही तीन मुले आहेत.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Adi Godrej". Forbes (इंग्रजी भाषेत). 2018-08-24 रोजी पाहिले.
  2. ^ Pi Kappa Lambda. Oxford Music Online. Oxford University Press. 2018-03-26.
  3. ^ "आदि गोदरेज की जीवनी -". It's Hindi (इंग्रजी भाषेत). 2015-09-07. 2018-08-24 रोजी पाहिले.
  4. ^ "आदि गोदरेज - Amarujala". Amar Ujala. 2018-08-24 रोजी पाहिले.
  5. ^ "17 साल की उम्र में छोड़ना पड़ा घर, आज हैं 26 हजार करोड़ रुपए के मालिक". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2018-08-24 रोजी पाहिले.