साचा:जमाती

ठाकर ही महाराष्ट्रातील आदिवासी जमात संपूर्ण महाराष्ट्रात आढळते. अखिल महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात ठाकर, ठाकूर जमातीचे

 लोक रहातात म्हणून १९७६ साली, १९५६ पासून अनुसूचित जमातींच्या संदर्भात फक्त पाच जिल्ह्यांतील केवळ २७ तालुक्यांसाठी  लागू असलेले क्षेत्रबंधन रद्द करण्यात आले व अखिल महाराष्ट्रातील ठाकूर ठाकर हे अनुसूचित जमातींमध्येच असल्याचा १०८ क्रमांकाचा कायदा १९७६ साली अस्तित्वात आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ठाकर आदिवासी:

औरंगाबाद जिल्ह्यात आदिवासी ठाकर व आदिवासी भिल्ल व टोकरे कोळी आहेत. ते अजिंठ्याच्या डोंगरात राहतात. कन्नड तालुका, नांदगाव तालुका, सोयगाव तालुका,सिल्लोड तालुका चाळीसगाव तालुका आणि खुल्ताबाद तालुका या परिसरात मोडणाऱ्या भूभागांत जवळ जवळ तीस हजार आदिवासी ठाकर राहतात. त्यांचे देवदेवता, रुढीपरंपरा ,चालीरीती, पोषक, खानपान वगैरे अकोला संगमनेर, कळसूबाई परिसरातील आदिवासी ठाकरांप्रमाणेच आहेत. त्यांच्याशी यांचे नातेसंबंध आहेत. आदिवासी ठाकरांच्या या परिसरात खोलापूर, गुजरदारी, कलंकी, शिप्घात(?), रंजाची वाडी, माणिकपुंज, काळदरी, तिसगाव, निरगुडी, पिप्री, लोंजे, चिवली, आदी तीस वाड्या आहेत. या वाडीवाडीत आगिवले, वारधे, सिद, सवत, पथवे, आवाले अशी तीस प्रकाराची आडनावे (कुलनामे) आढळतात. कुलनामानुसार त्यांचे देव्हारे विविध ठिकाणी आहेत. हे ठाकर खरोखरच आदिवासीच आहेत हे त्यांची बोली, पोषाख, देवदेवता, चालीरीती रुढी परंपरा, ई. तपासून पाहिले. आणि या परिसरातील आदिवासी बाबतीत ही स्वातंत्र्य काळातील पहिली घटना म्हणावी, त्या दिवशी त्यांनी सर्वांना आदिवासी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र दिले जातील ही घोषणा केली.तसेच महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात ठाकूर समाज आहे.

व्युत्पत्ती/उत्पत्ती

संपादन

अजंठा डोंगर परिसरातील ठाकर ही जमात ठाकर, ठाकूर,ठाकऱ्या या नावांनी ओळखली जाते. संस्कृती कोशात सांगितल्या प्रमाणे हे ठाकर घोंगड्या तयार करणे, नंदीबैल फिरविणे, बाहुल्यांचे खेळ करणे ही कामे मुळीच करतांना आढळत नाहीत. महाल देशातून आले ते म ठाकर, म म्हणजे मोठे, व क म्हणजे कनिष्ठ, किंवा चाफेकरांचे मते बोलीत क व मचा वापर पुन्हापुन्हा वापर केल्याने क व म ही नावे या क व म ठाकराना पडली असावीत. त्यांच्या पोशाखाबाबत काही दंतकथा सांगितल्या जातात.

कन्नड तालुक्यातील अंबाला ठाकर वाडीच्या देवाजी काळूजी आगिवले यांनी सांगितले की ठाकर हे मूळचे मुंगी पैठणचे. निजामाच्या जाचामुळे ते बालाघाट, कोकण,जुंदारखोरा, महालदेश, या ठिकाणी डोंगर दऱ्याखोऱ्यात लपले. तीन पिढ्यापासून पैठण सोडले. तेथून ते कोकणातील टाकेदला गेले. तेथून ते नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यात गेले. निजामाच्या सैनिकांशी दोन हात करतांना बायका आपले लुगडे आडवे खोचून गुंडाळत व त्या युद्धास सज्ज होत असत. पळापळीत जो वेश घेतला तो अद्यापही तसाच आहे. हा लढा शिवाजीच्या काळात दिला असेही सांगितले जाते.

पाथवे नावाचे ठाकर पळून पिठ्या डोंगरात गेले. तेथून ते वैतर डोंगरात गेले. ते गाव धरणात बुडाले. तेथून ते घोतीपासून ५ मैल दूर असलेल्या धनुली या गावी आले. तेथून बहिरवाडी आले. तेव्हा त्यांनी पथवेचा देव्हारा हा धनुलीहून बहिरवाडीला हलवला.

छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या काळात ठाकर हे मावळे होते, पथवे यांना जहागिरी मिळाली, मेंगाळ ठाकर हे चपरासी होते तर गावंडे ठाकर हे कोतवाल होते. गुन्हेगाराला तापलेल्या तव्यावर उभे करणे हे काम कोतवाल करी. अशा विविध दंतकथा ऐकू येतात.

संक्षिप्त आढावा आणि ओळख

संपादन

पार्श्वभूमी

संपादन

वर्णन

संपादन

==इतिहास == राया ठाकर आदिवासी क्रांतिकारी राया ठाकर हे राघोजी भांगरे यांचे आंगरक्षक होते लक्ष्या ठाकर रामजी भांगरे यांचे अंग रक्षक होते

बाह्यदुवे

संपादन

संदर्भ

संपादन

आदिवासी ठाकर (समाजशास्त्रीय अभ्यास) लेखक-डॉ.रमेश सूर्यवंशी ,अभ्यासिका प्रकाशन १, जून २०१०. ISBN -13-978-81-920256-3-6.

हे सुद्धा पहा

संपादन

लेखात प्रयुक्त संज्ञा

संपादन

शब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटा

संपादन
प्रयुक्त शब्द विशेष संदर्भ/अर्थ छटा
3 4

इंग्रजी मराठी संज्ञा

संपादन
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी

तळटिपा

संपादन