आत्मषटकम् तथा निर्वाणषटकम्[१] हे आदि शंकराचार्यांनी लिहिलेले सहा श्लोकांचे स्तोत्र आहे. हे स्तोत्र अद्वैत वेदांताचे सार सांगते. याची रचना इ.स.पू. ७८८-८२० च्या दरम्यान झाल्याचा अंदाज आहे.

रचना संपादन

हिंदू समजानुसार आदि शंकराचार्य आठ वर्षाचे असताना ते नर्मदा नदीकिनारी गोविंद भगवत्पादांना शोधत होते. त्यांची भेट झाल्यावर गोविंदांनी त्यांना तू कोण आहेस? असे विचारले. त्यावेळी शंकराचार्यांनी या श्लोकांद्वारे त्यांना उत्तर दिले.

निवडक श्लोक संपादन

मनोबुद्ध्यहंकारचित्तानि नाहं नच श्रोत्रजिह्वे नच घ्राणनेत्रे ।
नच व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानंदरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥१॥

मन, बुद्धि, अहंकार किंवा चित्त म्हणजे मी नव्हे. त्याचप्रमाणे कान, जीभ, नाक किंवा नेत्र म्हणजे मी नव्हे. आकाश, जल, पृथ्वी, तेज किंवा वायु ही पंचमहाभूतें म्हणजे मी नव्हे. मी शिव म्हणजे मंगलमय चिदानन्दरूप (शिवस्वरूप) आहे. ॥१॥

हे सुद्धा पहा संपादन

  1. ^ "Nirvana Shatkam - Works of Sankaracharya, Advaita Vedānta and Hindu Sacred Scriptures". Sankaracharya.org. 2007-09-22. 2014-02-07 रोजी पाहिले.