अण्वस्त्र

(आण्विक शस्त्रे या पानावरून पुनर्निर्देशित)

अण्विक (केंद्रकीय) विखंडन[श १] किंवा संमीलनातून[श २] उत्पन्न होणाऱ्या ऊर्जेचा वापर करून बनविलेल्या शस्त्रास अण्वस्त्र म्हणतात.

नागासाकीवरील अण्वस्त्र हल्ल्यादरम्यान निर्माण झालेला अळंबीच्या (मशरूम) आकाराचा ढग

दोन्हीही प्रकारच्‍या क्रियांमुळे अतिशय कमी मूलपदार्थांपासून प्रचंड प्रमाणात उर्जा बाहेर पडते. पहिल्‍या विखंडन प्रकारच्या अण्वस्त्र चाचणीमधून अंदाजे २०,००० टन टी.एन.टी. च्‍या (इंग्लिश: TNT) स्‍फोटाइतकी उर्जा बाहेर पडली होती आणि पहिल्‍या औष्णिक अणुकेंद्रीय[श ३]शस्‍त्रचाचणीमधून अंदाजे १,००,००० टन टी.एन.टी. च्‍या स्‍फोटाइतकी उर्जा बाहेर पडली होती.[]

अंदाजे १,१०० कि.ग्रॅ. वजन असलेल्‍या आधुनिक औष्णिक अणुकेंद्रीय शस्त्राची विस्‍फोटक शक्‍ती ही जवळपास १२,००,००० (बारा लाख) टन टी.एन.टी. च्‍या स्‍फोटाइतकी असते.[] याचा अर्थ, एखाद्‍या सर्वसाधारण बॉंबएवढा आकार असलेले अण्वस्त्रसुद्धा एखाद्या लहान शहराला आग व किरणोत्‍सर्गाने उद्धवस्‍त करू शकते. अण्वस्त्रांना मोठ्‍या प्रमाणातील विध्‍वंसक शस्त्र[श ४] असे समजले जाते आणि त्यांचा शोध लागल्यापासून त्‍यांचा वापर व नियमन हे मुद्दे आंतरराष्ट्रीय धोरणाचे केंद्रबिंदू राहिले आहेत.

पारिभाषिक शब्दसूची

संपादन
  1. ^ केंद्रकीय विखंडन - (इंग्लिश: nuclear fission - न्युक्लिअर फिशन)
  2. ^ केंद्रकीय संमीलन - (इंग्लिश: nuclear fusion - न्युक्लिअर फ्यूजन)
  3. ^ औष्णिक अणुकेंद्रीय बॉम्ब - (इंग्लिश: thermonuclear or hydrogen bomb - थर्मोन्युक्लिअर ऑर हायड्रोजन बॉम्ब)
  4. ^ मोठ्‍या प्रमाणातील विध्‍वंसक शस्त्र - (इंग्लिश: Weapon of Mass Destruction - व्हेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन)

संदर्भ

संपादन
  1. ^ बघा ट्रिनिटी अण्वस्त्र चाचणीआयव्ही माइक
  2. ^ बघा बी.८३ अण्वस्त्र