आंब
आंब ही हरभरा रोपाच्या पानावर हिवाळ्यात तयार होणारा एक द्रव पदार्थ आहे. हा चवीला आंबट असतो. या पदार्थामुळे हिवाळ्याच्या सकाळी पाने हरभऱ्याची पाने ओलसर जाणवतात. हरबऱ्याच्या आंबीत मोठ्या प्रमाणात ब जीवनसत्त्व असते. बाजारात आंब न काढलेला हरभरा क्वचित विक्रीला येतो.
गोळा करण्याची पद्धती
संपादनसंध्याकाळी एक स्वच्छ कापड हरभऱ्याच्या शेतावर अंथरून ठेवतात. पहाटे दव पडते तेव्हा पानावरून ओघळून आंब कापडावर येते व ते कापड ओले होते. ते कापड पिळून आंब मिळवतात.
उपयोग
संपादनआंब हा पोटदुखीवर उपाय आहे अशी समजूत आहे.
हरभऱ्याची कोवळी पाने खुडून न धुता त्याची भाजी करतात. या भाजीत आंबेचे सर्व गुण असतात. हरभऱ्याची पाने नंतर वापरण्यासाठी वाळवूनही ठेवता येतात.