आंतराराष्ट्रीय नृत्य दिवस
दरवर्षी २९ एप्रिल हा दिवस आंतराराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. बॅले नृत्याचे आद्य संस्थापक जीन-जॉर्जेस नोव्हेर (इ.स.१७२७-१८१०) यांचा हा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस पाळला जावा असे आंतरराष्ट्रीय नाट्यसंस्था(इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूशन-ITI) ने ठरवले. ही संस्था युनेस्कोची भागीदार असलेली स्वतंत्र संस्था आहे. तिच्या आदेशावरून इ.स. १९८२ सालापासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. या दिवशी, जगप्रसिद्ध आणि त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट नृत्य कलावंला जागतिक संदेश देण्यासाठी आमंत्रित केले जाते.
नृत्य कलेला आणि नृत्य कलावंताला जगमान्यता मिळावी, या कलेचा उत्कर्ष आणि अधिकाधिक प्रसार व्हावा आणि तिला राजाश्रय मिळावा हा उद्देश, आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा करण्यामागे आहे.