अच्युत जयवंत प्रभू
(अ.ज.प्रभू या पानावरून पुनर्निर्देशित)
अच्युत जयवंत प्रभू (जन्म - १५ ऑगष्ट इ.स.१९२६)
नागपूर येथे २९,३० डिसेंबर १९९६ रोजी झालेल्या नवव्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष.
विदर्भ-मराठवाडा बुक कंपनी या प्रकाशन संस्थेचे संस्थापक. अ.ज. प्रभूंनी, रामायण, महाभारत, योगवासिष्ठ, भागवत इत्यादी नावाजलेले ग्रंथ मोठ्या प्रमाणावर व अनेक खंडांत प्रकाशित करून, हे ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय केले. हे ग्रंथराज प्रकाशित करून जे मोठे सांस्कृतिक कार्य केले त्याचा जागतिक पातळीवर गौरव होऊन who in the world या अमेरिकेतील महत्त्वाच्या विश्वकोशात त्यांचा सन्मानपूर्वक उल्लेख आलेला आहे.