अस्तेकांचा स्पेनमधील प्रभाव
अस्तेकांचा प्रभाव प्रामुख्याने स्पेनमधील पाककृती आणि स्थापत्यशास्त्रांवर दिसून येते.
अन्न
संपादनस्पॅनिश कॉंकिस्तादोरांनी स्पेनमध्ये नेलेला अन्नप्रकारांमध्ये, ग्वाकामोले, हा सॉसमध्ये अव्होकॅडो मुरवून केलेला अन्नप्रकार १६व्या शतकातील अस्तेक पाककृतींमधला एक लोकप्रिय प्रकार होता. [१] मोली म्हणजेच "काहीतरी सॉसमध्ये रगडणे किंवा रस्सा घालणे" आणि "अवोकादो" अवाकात्ल म्हणजेच "आंड" ह्यापासून अवाका-मोली (मूळ अस्तेक भाषेतील "ग्वाकामोले" अर्थाचा शब्द) असा जोडशब्द बनला असून, या पदार्थास उत्तेजकाचा दर्जा मिळालेला होता. [१]
स्थापत्यशास्त्र
संपादनकेनरी बेटांवरील नुएस्त्रा सेन्योरा दे रेग्ला, पाजारा, फ्वेर्तेबेन्तुराच्या चर्चच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सूर्यनक्षी, सर्प, बिबट्या आणि पक्ष्यांचे शिल्पकाम आढळते. बऱ्याच तज्ज्ञांच्या मते त्या कामावर अस्तेकांचा प्रभाव दिसून येतो.[२][३]
संदर्भ
संपादन- ^ a b Zeldes, Leah A. (November 4, 2009). "Eat this! Guacamole, a singing sauce, on its day". Dining Chicago. Chicago's Restaurant & Entertainment Guide, Inc. 2010-03-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. November 5, 2009 रोजी पाहिले.
- ^ Government of the Canary Island page gobcan.es, retrieved 14 December 2009
- ^ Noel Rochford, Fuerteventura, Sunflower Books, 2007, p. 19