अष्टपदी
अष्टपदी हा एक गीतप्रकार आहे. पंडित जयदेव यांचा गीतगोविंद हा काव्यसंग्रह अष्टपदीचे उदाहरण आहे.गीतगोविंद याचा रचयिता जयदेव व त्याचे अनुकरण करणारे अन्य कवी यांनी रचलेल्या प्रबंधांना अष्टपदी म्हणले जाते.यात आठ चरणे असतात.
स्वरूप
संपादनध्रुव आणि आभोग असे याचे दोन अवयव आहेत आणि पद व बिरूद अशी दोन अंगे आहेत. यांचे राग हे कर्त्याने निश्चित केलेले असतात.
रचनेची वैशिष्ट्ये
संपादनअष्टपदीतील रचनांमध्ये कृष्णलीलेचे वर्णन असून पं. जयदेवांनी ती संस्कृत भाषेमध्ये रचलेली आहेत. गीत गोविंदमध्ये काही अष्टपदांची रचना रामचरित्रावरही केलेली आहे. अष्टपदांची बांधणी अनेक वेगवेगळ्या रागांत केलेली आढळते. पं. जयदेवांचा ‘गीत गोविंद' हा ग्रंथ महाराष्ट्रात अधिक प्रसिद्ध आहे. [१]
- ^ भारतीय संस्कृती कोश खंड पहिला,पृष्ठ ३२९