अविनाश डोळस (जन्म :  ; - अौरंगाबाद, ११ नोव्हेंबर २०१८) हे भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या बहुजन महासंघाचे नेते होते.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात मराठी विषयाचे ते प्राध्यापक होते. मराठी विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. डोळस हे आंबेडकरी चळवळीतील एक पुढारी होते.. त्यांनी आंबेडकरी विषयांवर काही पुस्तकेही लिहिली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य व प्रकाशन समितीचे ते माजी सदस्य सचिव होते.[१]

पुस्तके संपादन

  • आधारस्तंभ : प्राचार्य ल.बा. रायमाने (चरित्र, सहलेखक राम दोतोंडे)
  • आंबेडकरी चळवळ : परिवर्तनाचे संदर्भ
  • आंबेडकरी विचार आणि साहित्य
  • महासंगर (कथासंग्रह)
  • सम्यकदृष्टीतून...

सन्मान आणि पुरस्कार संपादन

  • जानेवारी १९९०मध्ये भरलेल्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद
  • जानेवारी २०११मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे भरलेल्या १२व्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ प्रा. अविनाश डोळस. Loksatta (Marathi भाषेत). 19-11-2018 रोजी पाहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रकाशन समितीमध्ये काम करताना त्यांनी अनुवादाच्या कामाला मोठी गती दिली. या क्षेत्रात त्यांनी झोकून देऊन काम केले. अलीकडेच बाबासाहेबांच्या ‘जनता’ या वृत्तपत्राचे पुनप्र्रकाशन करण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. महाडच्या सत्याग्रहानंतर झालेल्या न्यायालयीन प्रक्रियेची कागदपत्रे, त्यात बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली बाजू या दस्तऐवजाच्या अनुवादाचे कामही त्यांनी अंगावर घेतले होते. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)