सूर्योदय समयी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन पूर्वेकडे तोंड करून उगवत्या सूर्यास जल समर्पित केले जाते. यास 'अर्घ्य' असे म्हणले जाते. सूर्य उगवल्या पासून एक तासाच्या आत अर्घ्य देत असतात. यामुळे व्यक्ती उर्जावान होतो असे मानले जाते.[][]

नियम[][]
  • सूर्य उगवल्याच्या एक तासभारत अर्घ्य द्यायचे असते.
  • सूर्य दिसत नसला / ढगाआड लपलेला असला तरी अर्घ्य दिले जाते.
  • अर्घ्य देण्यापूर्वी स्नान करून सुचिर्भूत होऊनच अर्घ्य दिले जाते.
  • अर्घ्य देण्यासाठी तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या असावा.
  • पाण्यात फुलं किंवा फुलांच्या पाकळ्या घालाव्यात.
  • अर्घ्य हे पुर्वेकडे तोंड करूनच द्यायचे असते.
  • सूर्याला अर्घ्य देताना पडणाऱ्या पाण्याच्या धारेतून सूर्यकिरण परावर्तित होणे अधिक चांगले समजले जाते.
  • अर्घ्य देताना सूर्य मंत्र किंवा गायत्री मंत्र म्हटला जातो.
  • अर्घ्य देतेवेळेस तांब्याची उंची गोशृंगा इतकी, अर्थात सामान्य माणसाच्या छातीपर्यंत असावी.
  • नदी, तलावात अथवा तीर्थ क्षेत्री स्नान करताना जलपात्रात उभे राहून ओंजळीने अर्घ्य दिले जाते.

संदर्भ

संपादन
  1. ^ यावर जा a b "सूर्याला अर्घ्य देण्याची योग्य पद्धत काय? जाणून घ्या". दैनिक सकाळ. १८ मार्च २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ यावर जा a b "सूर्याला अर्घ्य देण्याचे फायदे आणि वैज्ञानिक कारण काय आहे ते पहा..." दैनिक लोकमत. १८ मार्च २०२४ रोजी पाहिले.