अरुण जेटली

भारतीय राजकारणी
(अरूण जेटली या पानावरून पुनर्निर्देशित)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


अरुण जेटली (जन्म : २८ डिसेंबर १९५२; - २४ ऑगस्ट २०१९) हे भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते होते.. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूकमंत्री होते. इ.स. २०००मध्ये ते राज्यसभेचे सदस्य झाले. ३ जून २००९ रोजी त्यांची राज्यसभेतील विरोधीपक्षनेते म्हणून नियुक्ती झाली.[१]

अरुण जेटली
Arun Jaitley, Minister.jpg
जन्म २८ डिसेंबर १९५२;
नवी दिल्ली
मृत्यू २४ ऑगस्ट २०१९
दिल्ली
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण बी.कॉम. एल्‌एल.बी.
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
जोडीदार संगीता जेटली
अपत्ये रोहन,सोनाली.

वैयक्तिक जीवनसंपादन करा

त्यांचे शालेय शिक्षण नवी दिल्ली येथील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये १९६०-६९च्या दरम्यान झाले. १९७३ मध्ये त्यांनी श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून वाणिज्य विषयात पदवी संपादन केली. १९७७ मध्ये दिल्ली विद्यापीठातून ते कायद्याची परीक्षा पास झाले.. सत्तरच्या दशकात ते दिल्ली विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) विद्यार्थी कार्यकर्ते होते. १९७४ मध्ये विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले. अरुण जेटली यांनी २४ मे १९८२ रोजी संगीता जेटलीशी लग्न केले. त्यांना दोन मुले, मुलगा रोहन आणि मुलगी सोनाली. अरुण जेटली यांचे २४ ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी १२.०७ वाजता निधन झाले.

भारताची सोळावी लोकसभासंपादन करा

१६व्या लोकसभेच्या कारकिर्दीत (सन २०१४ ते २०१९ या काळात) अरुण जेटली हे केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते.

वकिलीसंपादन करा

जानेवारी १९९० मध्ये अरुण जेटली यांना दिल्ली उच्च न्यायालयाने वरिष्ठ अधिवक्ता म्हणून नेमले गेले. १९८९ मध्ये त्यांची अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती झाली.[२]

पुरस्कारसंपादन करा

इ.स. २०२० चा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आला.[३]

संदर्भसंपादन करा

  1. ^ "About Me". Arun Jaitley (इंग्रजी भाषेत). 2019-08-01 रोजी पाहिले.
  2. ^ "WHO IS ARUN JAITLEY". Business Standard India. 2019-08-01 रोजी पाहिले.
  3. ^ "Padma Awards 2020: यंदाचा पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात संपन्न, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन गौरव". एबीपी माझा. Archived from the original on ८ नोव्हेंबर २०२१. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.