अरुण वाचनमाला ही आचार्य प्रल्हाद केशव अत्रेशंकर केशव कानेटकर यांनी संपादित केलेली क्रमिक पुस्तकांची मालिका आहे. या मालिकेच्या प्रकाशनाची सुरुवात १९३४ साली झाली होती. प्राथमिक शाळेत इयत्ता चौथी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होते तेव्हा विद्यार्थ्याचे भाषा विषयावर थोडे नियंत्रण येते. या काळात भाषण करणे, निबंध लिहिणे इतपर्यंत त्यांचा शब्दसंग्रह विविध व व्यापक झालेला असतो. वाक्यांची रचना व शब्दांचे स्वरूप समजण्याइतकी व्याकरणाची माहिती त्यांना असते. वाचनाच्या क्रियेतील प्राथमिक अडचणी या वेळी बऱ्या प्रमाणात नाहीशा झालेल्या असतात. याकाळात विद्यार्थी सुस्पष्ट वाचन करायला सक्षम होतात. त्यामुळे वाचनाची ओढ व आवड या काळात त्यांच्या मनात निर्माण होते. म्हणून याच मालिकेचे पुनःप्रकाशन १३ ऑगस्ट २०१७ रोजी डिंपल पब्लिकेशनतर्फे मुंबईत केल्या गेले.[१]

सदरील ग्रंथांत ज्ञानेश्वर, मुक्तेश्वर, नामदेव, तुकाराम, रामदास, मोरोपंत, रघुनाथ पंडित अशा प्राचीन संत आणि कवी सह केशवसुत, चंद्रशेखर, दत्त, लेंभे, माधवानुज, रे. टिळक, गोविंदाग्रज, रेंदाळकर, ठोंबरे, हिंगणेकर या सर्व कवींच्या कवितांचा समावेश करण्यात आला होता. याशिवाय नव्या पिढीतील भा.रा. तांबे, बी, माधव जूलियन, यशवंत, गिरीश, अनिल, अज्ञातवासी, गोपीनाथ, ठोकळ, अशा कवींच्या देखील काही निवडक कवितांचा यात समावेश करण्यात आला होता. तर गद्य विभागात विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर, शिवराम महादेव परांजपे, अच्युत बळवंत कोल्हटकर, विनायक दामोदर सावरकर, दत्तो वामन पोतदार, किर्लोस्कर, देवल, कोल्हटकर, खाडिलकर, केळकर, गडकरी, वरेरकर, अत्रे, हरि नारायण आपटे, खांडेकर, यशवंत गोपाळ जोशी, कुमार रघुवीर, प्रो. फडके, प्रो. दांडेकर, श्री. अनंत काणेकर यांच्या लेखन साहित्याचा देखील यात समावेश करण्यात आला होता.[१]

संदर्भ संपादन

  1. ^ a b "पुन्हा 'अरुण वाचनमाला'!". ८ जुलै २०२३ रोजी पाहिले.