अरुणा जयंती

भारतीय महिला उद्योगपती


अरुणा जयंती ह्या जानेवारी २०११ पासून Capgemini india(कॅपजेमिनी भारत) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.‘भारतातल्या सर्वाधिक सामर्थ्यशाली उद्योजिकांपैकी एक, ही अरुणा जयंती यांची ओळख गेले दीड दशक कायम राहिली आहे. कॅपजेमिनी उद्योगसमूहाच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या त्या सदस्य आहेत,कॅपजेमिनी इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत आणि स्वीडन कंट्री बोर्ड, कॅपजेमिनी स्वीडनच्या त्या अध्यक्ष आहेत.[१] नॅसकॉम (NASSCOM)  एक्झिक्युटिव्ह काउन्सिलच्या त्या निवडून आलेल्या सदस्य आहेत आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कालिकतच्या नियामक मंडळावर त्या काम करतात. २०१३ मधल्या इंडिया टूडे विमेन समिटमध्ये 'इंडिया टुडे वूमन इन द कॉपेरिट वर्ल्ड' म्हणून त्यांना गौरवलं गेलं होतं.[]

अरुणा जयंती
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा मुख्य कार्यकारी अधिकारी, Capgemini बिझनेस, अध्यक्ष, राज्यपाल मंडळ,NIT कालिकत
धर्म हिंदू
जोडीदार मधुसूदन गोपीनाथ
अपत्ये

व्यक्तिगत माहिती

संपादन

अरुणा जयंती यांचा जन्म दक्षिण भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबातला. पारंपरिक मूल्यांवर भर देणार हे कुटुंब असलं तरी घरात मुलगा-मुलगी असा भेद नव्हता. आपले निर्णय आपल्या आवडीने घेण्याचे स्वातंत्र्य त्यांच्या घरानं मुलींना दिलं होतं.[] अरुणा यांनी गणित आणि संख्याशास्त्र हे विषय पदवीसाठी निवडले. त्यानंतर मुंबईमध्ये नरसी मोजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये त्यांनी मास्टर्स इन मॅनेजमेंट (फायनान्स) पूर्ण केलं. हे शिक्षण पूर्ण करतानाच त्यांना टाटा कन्सलटन्सी सव्र्हिसेस (TCS)मध्ये नोकरी मिळाली, करिअरच्या अगदी प्रारंभीच्याच या नोकरीनं त्यांना मुंबई, युके आणि स्वित्झर्लंडमध्ये काम करण्याची संधी दिली. काही वर्षांनंतर त्या ॲपटेकमध्ये रुजू झाल्या आणि २००३ मध्ये त्यांनी कॅपजेमिनीत प्रवेश केला, अरुणा जयंती विवाहित आहेत; मुंबईमध्ये त्या पती आणि मुलीसह राहतात.[]

बाह्यदुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "अरुणा जयंती- Navbharattimes Photogallery". https://navbharattimes.indiatimes.com (हिंदी भाषेत). 2018-09-11 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  2. ^ "India - Citation Notes". Foreign Law Guide. 2018-09-11 रोजी पाहिले.
  3. ^ "अरुणा जयंती- Navbharattimes Photogallery". https://navbharattimes.indiatimes.com (हिंदी भाषेत). 2018-09-11 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)