अरविंद भुजबळ हे मराठी साहित्यातील नामवंत कवी होते. पिंपरी महानगर पालिकेत काम करीत होते. युवा कवी म्हणून १९९० च्या दशकात त्यांनी साहित्य चळवळीत खूप उपक्रम राबविले. बाणेर येथे ते राहात होते. होकाराचा शब्द मला दे नकोत आणा भाका गं या पठ्याची जगात नाही दुसरी कोठे शाखा गं ही त्यांची गेय कविता खूप गाजली. अरविंद भुजबळ, प्रकाश पठारे कविसंमेलनाचे कार्यक्म करीत. वयाच्या चाळीसीतच त्यांचे अपघाती निधन झाले.