अमेरिकेच्या प्रतिनिधींचे सभागृह

(अमेरिकेचे प्रतिनिधीगृह या पानावरून पुनर्निर्देशित)

अमेरिकेच्या प्रतिनिधींचे सभागृह (इंग्लिश: United States House of Representatives) हे अमेरिकन काँग्रेसच्या दोन सभागृहांपैकी एक आहे (अमेरिकेची सेनेट हे दुसरे सभागृह). अमेरिकेच्या सर्व राज्यांतील एकूण ४३५ प्रतिनिधी ह्या सभागृहसाठी निवडले जातात. प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येप्रमाणे त्या राज्यामधील प्रतिनिधींची संख्या ठरवली गेली आहे. कॅलिफोर्निया ह्या अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्येच्या राज्यामधून ५३ सदस्य तर कमी लोकसंख्या असलेल्या काही राज्यांमधून प्रत्येकी १ सदस्य निवडले जातात.

हाउस ऑफ रेप्रेझेंटेटिव्ह्सचे चिन्ह
अमेरिकन कॅपिटलमधील सभागृहाची जागा
२००० साली पाडलेले काँग्रेसचे निवडणुक जिल्हे

प्रतिनिधींचा कार्यकाळ २ वर्षे असतो. दर दोन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांमध्ये नवीन प्रतिनिधी निवडले जातात. नोव्हेंबर, इ.स. २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाने २४७ जागा जिंकून आपले बहुमत राखले. ह्या पक्षाचा पॉल रायन हा सभागृहाचा विद्यमान सभापती आहे.

बाह्य दुवे

संपादन